IMPIMP

Tirupati Balaji Flood | अवकाळी पावसाचा आंध्रात कहर ! तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेले भाविक अडकले; महाराष्ट्रासह गोव्याला पावसाचा इशारा

by nagesh
tirupati balaji flood andhra pradesh rains 8 killed 12 missing as heavy rain floods andhra districts devotees who went to see tirupati balaji got stuck rain warning to maharashtra and goa

हैदराबाद : वृत्तसंस्था  – Tirupati Balaji Flood | अवकाळी पावसाने तामिळनाडू, आंध्र प्रदेशात कहर केला असून अनेक ठिकाणी जनजीवन ठप्प झाले आहे. आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. दरम्यान तामिळनाडू, पुदुच्चेरी, आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि कर्नाटक या भागात शनिवारी हलक्या पावसाचा हवामान विभागाने इशारा दिला आहे तर केरळ, तेलंगणा, महाराष्ट्र, गोवा आणि राजस्थानमध्येही पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेले भाविक अडकले आहेत. तिरुपती आंतरराष्ट्रीय विमानतळ उड्डाणसेवेसाठी शुक्रवारी सुरू करण्यात आले आहे. मात्र, तिरुमला टेकड्यांवरून जाणारे घाटांतील दोन रस्ते मात्र बंद ठेवले होते. दरम्यान, अलीपीरी भागातून तिरुमलाकडे (tirupati tirumala trust) जाणाऱ्या रस्त्याला भूस्खलनामुळे (Tirupati Balaji Flood) मोठा फटका बसला आहे.

त्यामुळे वाहतुकीसाठी हा रास्ता बंद ठेवण्यात आला आहे. तर तिरुपतीच्या दर्शनासाठी गेलेले भाविकांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था तिथेच करण्याच्या सुचना मुख्यमंत्री रेड्डी यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. (Tirupati Balaji Flood)

बंगालच्या उपसागरात कमी दबावाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं आंध्र प्रदेशमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे.
मुसळधार पावसामुळे राज्यातील नद्यांनी उग्र रूप धारण केलं आहे.
चित्तूर आणि कडप्पा मध्ये गेल्या अनेक वर्षांत पाहायला मिळाली नाही अशी पूरस्थिती पाहायला मिळतेय.
हवाईदल, एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे.
शुक्रवारी रायलसीमा भागातील तीन जिल्ह्यांत आणि एका दक्षिण समुद्रकिनारी जिल्ह्यात २० सेंटीमीटरपर्यंत पाऊस कोसळल्यानं इथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पावसात वेगवेगळ्या कारणाने ८ जणांचा मृत्यू झाला आहे तर कडप्पा जिल्ह्यातील १२ लोक बेपत्ता असल्याचे समोर आले आहे.



Join our
Sarkarsatta WhatsApp Group Link , TelegramFacebook page for every update

पावसामुळे आंध्र प्रदेशची परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात येत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्यासोबत फोनवरून संपर्क साधून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर सर्व प्रकारची मदत पुरवण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले. नद्यांना आलेल्या पुरात अनेक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. यामुळे जनजीवनही विस्कळीत झालंय. त्यामुळे आज मुख्यमंत्री रेड्डी पूरग्रस्त भागाचा हवाई दौरा आणि पाहणी करणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयानं सांगितले आहे.

हवामान विभागाचा इशारा

उत्तर तामिळनाडू, पुदुच्चेरी, करायकाल आणि रायलसीमेच्या काही भागांवर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याशिवाय गोवा, कोकण, उत्तर कर्नाटक, तटीय कर्नाटक, दक्षिण मध्य कर्नाटकच्या अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवली असून तेलंगणा, महाराष्ट्र, गोवा आणि पूर्व राजस्थानच्या अनेक भागांतही वेगाच्या वाऱ्यासहीत वीज कडकडाटाचा आणि पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Web Title :- tirupati balaji flood andhra pradesh rains 8 killed 12 missing as heavy rain floods andhra districts devotees who went to see tirupati balaji got stuck rain warning to maharashtra and goa

Aurangabad Crime | मालमत्तेच्या वाटणीवरून मुलगा आणि सुनेनं केलेल्या मारहाणीत बापाचा मृत्यू; प्रचंड खळबळ

Honey Trap | कोल्हापूरचा व्यापारी अडकला हनीट्रॅपमध्ये; सव्वातीन कोटी उकळले, फॅशन डिझायनर महिलेसह दोन सराफांना अटक

Pune Crime | ‘मला प्रेयसीबरोबर लग्न करायचे आहे, तू आत्महत्या कर’ ! 31 वर्षीय पतीकडून 29 वर्षीय पत्नीचा अमानुष छळ; पुण्यातील धक्कादायक घटना

Related Posts