IMPIMP

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलियस, स्मार्ट लायन्स् संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !

by nagesh
Punit Balan Group Women's Premier League | 7th Puneet Balan Group Women's Premier League T-20 Cricket Tournament; Fight for the title among the Neutralus, Smart Lions teams!

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Punit Balan Group Women’s Premier League | अ‍ॅल्थिट्युड स्पोर्ट्स मॅनेजमेंट तर्फे आयोजित सातव्या ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये न्युट्रीलियस संघ आणि स्मार्ट लायन्स् संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे. (Punit Balan Group Women’s Premier League)

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत इशा घुले आणि सायली लोणकर यांच्या कामगिरीमुळे न्युट्रीलियस संघाने हेमंत पाटील ग्रुप संघाचा ३४ धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना न्युट्रीलियस संघाने २० षटकात १४४ धावा धावफलकावर लावल्या. इशा घुले हिने ५८ धावांची खेळी करून फलंदाजीची धुरा सांभाळली. यासह सोनल पाटील (३० धावा) आणि ऋतुजा गिलबिले (नाबाद १८ धावा) यांनी महत्वपूर्ण योगदान दिले.

या आव्हानाला उत्तर देताना हेमंत पाटील ग्रुपला ११० धावाच करता आल्या. पुर्वा भिडकर हिने ५६ धावांची खेळी करून एकहाती लढा दिला. दुसर्‍या बाजूने इशा पाठारे (१३ धावा) आणि पुनम खेमनार (१३ धावा) यांच्या व्यतिरिक्त कोणीही साथ दिली नाही. सायली लोणकर हिने क्षेत्ररक्षणामध्ये ३ धावबाद व एक झेल घेत संघाच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला. आता न्युट्रीलियस संघ आणि स्मार्ट लायन्स् संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे.

उपांत्य फेरीः सामन्याचा संक्षिप्त निकालः

न्युट्रीलियस संघः २० षटकात ६ गडी बाद १४४ धावा (इशा घुले ५८ (४९, २ चौकार, ३ षटकार), सोनल पाटील ३०, ऋतुजा गिलबिले नाबाद १८, पुर्वा भिडकर १-२१) वि.वि. हेमंत पाटील ग्रुपः १८ षटकात १० गडी बाद ११० धावा (पुर्वा भिडकर ५६ (५३, ७ चौकार, १ षटकार), इशा पाठारे १३, पुनम खेमनार १३, स्वांजली मुळे २-१७); सामनावीरः इशा घुले.

Web Title :- Punit Balan Group Women’s Premier League | 7th Puneet Balan Group Women’s Premier League T-20 Cricket Tournament; Fight for the title among the Neutralus, Smart Lions teams!

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Rupali Patil on Sadabhau Khot | सदाभाऊ खोत यांचं केतकीला समर्थन; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची सदाभाऊंवर टीका; म्हणाल्या…

Pune Crime | आंबेगाव पठार येथील 23 वर्षीय तरुणीचे अश्लील फोटो मॉर्फ करुन बदनामी

Cholesterol Control | योगासनाच्या मदतीनं कोलेस्ट्रॉल कमी होतो? जाणून घ्या कोणतं आसान राहिल लाभदायक

Related Posts