IMPIMP

Tulja Bhavani Temple News | तुळजाभवानीच्या दर्शनासाठी ड्रेसकोड, मंदिर परिसरात झळकले फलक; अचानक घेतलेल्या निर्णयामुळे भाविकांची गैरसोय

by nagesh
Tulja Bhavani Temple News | Dress code for darshan of Tulja Bhavani, boards displayed in temple premises; Devotees are inconvenienced by the sudden decision

तुळजापूर : सरकारसत्ता ऑनलाईन – संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात (Tuljabhavani Temple News) दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना (Devotees) आता ड्रेस कोड (Dress Code) देण्यात आला आहे. तोकड्या कपड्यात आलेल्या भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार नाही, अशा अशयाचे फलक मंदिर परिसरात झळकले आहेत. भारतीय संस्कृतीचे पालन करा असे आवाहनही यावर करण्यात आले आहेत. मात्र अशा प्रकारचे फलक लावण्याचा अधिकृत निर्णय मंदिर समितीने (Tulja Bhavani Temple News) घेतला नसल्याचे मंदिर समितीचे अध्यक्ष (Temple Committee President) तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे (Collector Dr. Sachin Ombase) यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या लग्नसराई सुरू असल्याने तुळजापूरला देवीचे (Tulja Bhavani Temple News) दर्शन घेण्यासाठी
येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यातच शाळेला उन्हाळी सुट्ट्या असल्याने पर्यटन आणि देवदर्शन यासाठी
भाविक मोठ्या प्रमाणात तुळजापूरला येत आहे. मात्र ड्रेसकोड संदर्भात कोणतीही पूर्वसूचना न देता गुरुवारी मंदिर परिसरात अचानक फलक लावण्यात आले. यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यातून आलेल्या भाविकांची गैरसोय झाली आहे.

मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या फलकावर सर्वात वर तुळजाभवानी मंदिर संस्थान असा उल्लेख करण्यात
आला आहे. यानंतर अंगप्रदर्शन, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाप पँन्ट, बर्म्युडाधारींना मंदिरात
प्रवेश नाही. कृपया भारतीय संस्कृती (Indian Culture) आणि सभ्यतेचे भान ठेवा असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणतीही पूर्वसूचना न देता असे फलक लावण्यात आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
तर तुळजापूर परिसरातील काही भाविक व पुजारी यांनी या निर्णयाचे स्वागत करुन मंदिर प्रशासन
कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे सत्कार केले आहेत.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

निर्णय योग्य मात्र लेखी आदेश नाहीत – जिल्हाधिकारी

या प्रकाराबाबत तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी सांगितले की,
भारतीय संस्कृती व सभ्यतेचे मंदिरात प्रवेश करतान सर्वांनीच पालन करायलाच हवे. ही अपेक्षा रास्त आहे.
त्यामुळे त्याचे स्वागत करायला हवे. तेथील स्थानिकांच्या पुढाकाराने हे फलक लावण्यात आले आहेत.
मंदिर समितीच्या वतीने तसा अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही किंवा तसे लेखी आदेशही देण्यात आले नाहीत.

Web Title : Tulja Bhavani Temple News | Dress code for darshan of Tulja Bhavani, boards displayed in temple premises; Devotees are inconvenienced by the sudden decision

Related Posts