IMPIMP

Pune Crime | ‘मला प्रेयसीबरोबर लग्न करायचे आहे, तू आत्महत्या कर’ ! 31 वर्षीय पतीकडून 29 वर्षीय पत्नीचा अमानुष छळ; पुण्यातील धक्कादायक घटना

by nagesh
Pune Crime | In Pune's family court, the husband knocked his wife out of a book

पुणे : सरकारसत्ता  ऑनलाइन – आपल्या आईच्या उपचारासाठी माहेरहून ५० हजार रुपये घेऊन येण्याची मागणी करुन मला प्रेयसीबरोबर लग्न करायचे आहे. तु आत्महत्या कर आणि माझ्या आयुष्यातून निघून जा असे धमकाविण्याचा धक्कादायक (Pune Crime) प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी २९ वर्षाच्या महिलेच्या फिर्यादीनंतर चतु:श्रृंगी पोलिसांनी (chaturshringi police station) प्रतिक कांबळे (वय ३१, रा. अलिबाग) याच्यासह त्याच्या आईवडिलांवर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , TelegramFacebook page for every update

हा प्रकार अंबरनाथ आणि चार्‍होळी येथे ३ फेब्रुवारी ते २५ जून २०२१ दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पती व सासूसासरे यांनी संगनमत करुन सासुबाई यांच्या उपचारासाठी माहेरहून ५० हजार रुपये घेऊन ये अशी फिर्यादीकडे वारंवार मागणी केली. प्रतिक कांबळे याने फिर्यादी यांना मला प्रेयसीबरोबर लग्न करायचे आहे.

तू आत्महत्या कर व माझ्या आयुष्यातून निघून जा, असे म्हणून शिवीगाळ करुन मारहाण (Pune Crime) केली.
फिर्यादी यांचा मानसिक व शारीरीक छळ केल्याने त्या माहेरी निघून आल्या.
त्यानंतर आता त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक माळी (PSI Mali) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | ‘I want to marry my lover, you commit suicide’! Inhuman abuse of a 29-year-old wife by a 31-year-old husband; Shocking incident in Pune chaturshringi police station marathi

GST | नवीन वर्षात तयार कपडे अन् पादत्राणांच्या किंमती 5 ते 12 टक्क्यांपर्यंत वाढणार

EPFO | किमान पेन्शन आणि व्याजदरावर आज येणार निर्णय ! 3000 रुपये होऊ शकते पेन्शन, जाणून घ्या सविस्तर

Sharad Pawar | 3 कृषी कायदे रद्द केल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘उशिरा का होईना, शहाणपण आलं’

Related Posts