IMPIMP

Corona 3rd Wave | तिसर्‍या लाटेची चाहूल? पुन्हा नवीन केस 40 हजारच्या पुढे, अ‍ॅक्टिव्ह प्रकरणे सुद्धा वेगाने वाढली

by nagesh
Corona 3rd Wave | coronavirus third wave coming news covid 19 cases crossed 40000 mark second day

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Corona 3rd Wave | कोरोनाच्या दुसर्‍या लाटेपासून थोडासा दिलासा मिळाल्याची स्थिती होती, परंतु पुन्हा एकदा संकट वाढताना (Corona 3rd Wave) दिसत आहे. अवघ्या एका दिवसात पुन्हा 40 हजारपेक्षा जास्त नवीन केस सापडल्या आहेत. मागील 24 तासात कोरोनाची 44,658 नवी प्रकरणे समोर आली. यासोबतच अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांची संख्या सुद्धा वेगाने वाढत 3,44,899 झाली आहे.

इतकेच नव्हे, नवीन केसेसमधील वाढीने अ‍ॅक्टिव्ह केसची टक्केवारी सुद्धा आता 1.06 टक्के झाली आहे, जी याच आठवड्याच्या सुरूवातीला 1 टक्क्यापेक्षा कमी झाली होती. इतकेच नव्हे, याच्यामुळे रिकव्हरी रेटमध्ये सुद्धा घट झाली आहे आणि तो आता 97.60% झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 रिकव्हर होणार्‍यांची संख्या घटतेय, वाढत आहेत प्रकरणे

कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह केसमध्ये वाढ होण्याचे एक कारण हे सुद्धा आहे की, नवीन प्रकरणांच्या तुलनेत रिकव्हर होणार्‍या लोकांची संख्या कमी होत आहे. एकीकडे दोन दिवसांपासून लागोपाठ 40 च्या पुढे केस मिळत आहेत तर रिकव्हर होणार्‍या लोकांची संख्या कमी आहे. मागील एका दिवसात 32,988 लोक कोरोनावर मात करून बरे झाले आहेत.

यापूर्वी गुरुवारी एक दिवसात 46 हजारपेक्षा जास्त नवीन केस समोर आल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा 44 हजार केस सापडल्याने चिंता वाढली आहे. देशाच्या अनेक राज्यांनी शाळा, जिम आणि मॉलसारख्या संस्था खुल्या केल्याने आता प्रकरणांमध्ये झालेल्या वाढीने चिंता वाढली आहे. अशावेळी लॉकडाऊनसारख्या सक्तीचा काळ पुन्हा येऊ शकतो.

 

उत्तर भारतातील राज्यांना दिलासा, केरळात संकट

मात्र, देशात नवीन प्रकरणांची संख्या कमी आहे, यामध्ये मोठी भागीदारी केरळची आहे. एकट्या
केरळमधून एकुण कोरोना केसपैकी 70 टक्के प्रकरणे समोर येत आहेत. केरळमध्ये लागोपाठ दोन
दिवसांपासून 30 हजारपेक्षा जास्त नवीन केस सापडत आहेत आणि त्यामुळे देशभरात प्रकरणांची
वाढ होताना दिसत आहे.

परंतु, यूपी, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा, पंजाब, गुजरात, आंध्र प्रदेश सारख्या राज्यांमध्ये अजूनही पहिल्याच्या तुलनेत स्थिती दिलासादायक आसल्याचा दावा केला जात आहे. या राज्यांमध्ये नवीन केस शेकड्यांमध्येच आहेत, तर केरळ आणि महाराष्ट्रात आकडे हजारमध्ये आहेत.

 

लसीकरण वेग होत असल्याचा दावा

कोरोनाच्या नवीन प्रकरणांत वेगाने वाढ असताना दिलासादायक बाब ही आहे की, देशात
व्हॅक्सीनेशन अभियान वेगाने सुरू आहे. आतापर्यंत 61.22 कोटी डोस देशभरात दिले गेले आहेत,
असा दावा केंद्र सरकारने केला आहे. जर कोरोनाची तिसरी लाट आली तरी ती पहिल्यासारखी
घातक नसेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

Web Title : Corona 3rd Wave | coronavirus third wave coming news covid 19 cases crossed 40000 mark second day

 

हे देखील वाचा :

Gold-Silver Price Today | घसरणीनंतर सोने महागले, चांदीही वधारली; जाणून घ्या आजचे दर

UIDAI | आधार कार्ड धारकांना नाही मिळणार ‘या’ दोन सुविधांचा लाभ, जाणून घ्या तुमच्यावर काय होणार परिणाम

 

 

Related Posts