IMPIMP

Homeguards | राज्यातील 42 हजार होमगार्डचं मानधन थकलं, सरकारकडून मानधन न मिळाल्यानं आर्थिक संकट

by nagesh
Homeguards | 42000 homeguards in state are helpless starvation due to non receipt of honorarium from the government

मुंबई (Mumbai): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)गतवर्षीपासून कोरोनाच्या संकटाने (Corona virus) देशावरच नाही, तर जगावर राज्य केलं आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊन जाहीर केलं. यानंतर कायदा आणि सुव्यवस्था तसेच कोरोनाचे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे अंमलबजावणीच काम पोलीस प्रशासनाबरोबर होमगार्ड (Homeguards) देखील करत आहेत. लॉकडाऊन काळात शहराच्या शहराच्या कडक बंदोबस्तासाठी होमगार्ड (Homeguards) यांना देखील दिवस रात्र राबावे लागत आहे. मात्र अशा परिस्थितीत होमगार्ड्स (Homeguards) यांना त्यांचं हक्काचं मानधन (Remuneration) राज्य सरकारकडून (State Government) थकवण्यात आलं आहे. यावरून अशा संकटाच्या परिस्थितीत होमगार्ड्स यांच्यावर उपासमारीची वेळ आलीय.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

महाराष्ट्रातील तब्बल 42 हजार होमगार्ड्सचं मानधन (Remuneration) राज्य सरकारनं (State Government) थकवलं आहे. म्हणून अनेक होमगार्ड्सवर उपासमारीची (Starvation) वेळ आलीय. एप्रिल महिन्यापासून जुलैपर्यंत अशा एकूण 4 महिन्यांचं मानधन थकलं आहे. मुख्यतः म्हणजे महासमादेशक कार्यालयाकडे होमगार्ड्सना मानधन देण्यासाठी निधीच शिल्लक नाही. म्हणून महाराष्ट्रातील 42 हजाराहून जादा होमगार्ड्सच्या पोटा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मानधन न मिळून देखील हे जवान वेगवेगळे सण, उत्सव, निवडणुका, राजकीय सभा अशा कार्यक्रमात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिवस रात्र राबत आहेत. परंतु त्यांच्या कामाचा मोबदला मिळत नाही.

 

 

दरम्यान, खरंतर 2 वर्षांपूर्वी होमगार्ड्सच्या (Homeguards) मानधनात वाढ केली होतीय. 2 वर्षांपूर्वी त्यांना एका दिवसासाठी तीनशे रुपये मिळत होते. मात्र, आता त्यांना एका दिवसासाठी 670
रुपये दिले जातात. प्रशासनाकडून होमगार्ड्सचं (Homeguards) मानधन वाढवलं खरं पण त्यांना
देण्यासाठी लागणाऱ्या पैशांची तरतूद वार्षिक अंदाजपत्रकात करण्यात आली नव्हती. म्हणून आता
महासमादेशक कार्यालयाकडे निधीचा तुटवडा जाणवत आहे. गतवर्षी लॉकडाऊनच्या सुरुवातीला
होमगार्ड्सचं मानधन (Remuneration) थकवण्यात आलं होतं. अशा कोरोनाच्या परिस्थतीत लॉकडाऊनमुळे अनेक व्यवहार ठप्प झाला. तसेच, रस्त्यावर बंदोबस्तासाठी होमगार्ड्स दिवस रात्र अपार मेहनत घेत आहेत. मात्र त्यांना त्यांचं मानधन कधी मिळणार?

 

 

Web Title : Homeguards | 42000 homeguards in state are helpless starvation due to non receipt of honorarium from the government

 

हे देखील वाचा :

Gold-Silver Price Today | आज उच्चांकी स्तरावरून 7,817 रुपये ‘स्वस्त’ मिळतंय सोने, जाणून घ्या 10 ग्रॅमचा भाव

Modi Government | खुशखबर ! मोदी सरकार करू शकते मोठी घोषणा, बेसिक सॅलरी 15000 ने वाढून होऊ शकते 21000

Tokyo Olympics | मेडल जिंकण्यापूर्वी बोट रिपेयर करण्यासाठी महिला खेळाडूने केला ‘कंडोम’चा वापर, व्हिडिओ पाहून लोक होत आहेत ‘हैराण’

 

Related Posts