IMPIMP

MNS MLA Raju Patil | म्हाडा सोडतीत कथित गैरव्यवहार प्रकरणात मनसे आमदार राजू पाटील यांच्याविरोधात फौजदारी दावा

by nagesh
Mhada Lottery 2023 | important dates apply process pune mhada lottery 2023 news

कल्याण : सरकारसत्ता ऑनलाइन – म्हाडा इमारतीतील (MHADA building) सोडतीत घोटाळ्याचा आरोप केल्याप्रकरणी मनसे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांच्या विरोधात फौजदारी दावा दाखल करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. प्रदीप झेंडे यांनी दिली आहे. राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांच्या विरोधात कल्याण न्यायालयात (kalyan court) हा दावा दाखल करण्यात आला आहे, असे अ‍ॅड. झेंडे यांनी सांगितले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

कल्याण मतदारसंघातील (kalyan constituency) मौजे खोणी येथे असलेल्या म्हाडा इमारतीच्या सोडतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप मनसे आमदार
राजू पाटील यांनी केला. तसेच याची चौकशी करावी अशी मागणी पाटील यांनी म्हाडाकडे केली होती. परंतु म्हाडाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी या सोडतीमध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप झाला नसून मानवी हस्तक्षेप करण्यास वाव नसल्याचे सांगितले.

तसेच म्हाडाच्या वरिष्ठ लिपीक छाया राठोड (chhaya rathod) यांच्या नातेवाईकांनी सर्व अटी-नियमांची पूर्तता करुन सदनिकांचा ताबा घेतल्याचे चौकशीत स्पष्ट करत ही तक्रार निकाली काढली, असे अ‍ॅड. प्रदीप झेंडे यांनी सांगितले. मनसे आमदार राजू पाटील यांनी नाहक बदनामी केल्याचे सांगत कल्याण न्यायालयात त्यांच्याविरोधात फौजदारी दावा (Criminal claim) केल्याचे, अ‍ॅड. प्रदीप झेंडे (Adv. Pradeep Zende) यांनी सांगितले आहे.

 

Web Title : claim of defamation suit against mla raju patil for alleged misconduct in mhada draw

 

हे देखील वाचा :

Delta Plus Variant | राज्यात डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव वाढला; रत्नागिरी, जळगावमध्ये सर्वाधिक रुग्ण

Pune Corporation Amenity Space | राष्ट्रवादीच्या माघारी मुळे सत्ताधाऱ्यांनी अ‍ॅमिनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव ‘गुंडाळला’ !

Sangli Crime | कोडोली येथील माय-लेकीची वारणा नदीत उडी टाकून आत्महत्या

 

Related Posts