IMPIMP

COVID-19 3rd Wave | नीति आयोगाचा गंभीर इशारा, म्हणाले – ‘सप्टेंबरमध्ये दररोज आढळू शकतात कोरोनाचे 4-5 लाख नवे रूग्ण’ ! 2 लाख ICU बेड तयार ठेवण्यास सांगितलं

by nagesh
Maharashtra New Corona Guidelines | maharashtra corona guidelines revised directions for containing spread of coronavirus

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मागील एक वर्षात कोरोना व्हायरसच्या संसर्गाने देशाला उद्ध्वस्त केले आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतून भारत अद्याप सावरलेला नाही. देश-विदेशात तिसर्‍या धोकादायक लाटेची (COVID-19 3rd Wave dangerous) शक्यता व्यक्त केली जात आहे. आता भारताच्या निती आयोगा (Policy Commission of India) ने सुद्धा कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता (possibility of a COVID-19 3rd Wave) व्यक्त केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल (V. K. Paul) यांनी मागील महिन्यात सरकारला कोरोना संसर्गाला तोंड देण्यासाठी काही सूचना दिल्या होत्या. यात
म्हटले होते की भविष्यात प्रति 100 कोरोना व्हायरस संसर्गाच्या प्रकरणांपैकी 23 प्रकरणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची व्यवस्था करावी लागेल.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सीजन आणि औषधांअभावी अनेक रूग्णांना जीव गमवावा लागला होता, तसेच प्रचंड गोंधळ उडाला होता. कारण,
कोरोना संसर्गाचा वेग इतका जास्त होता की तेवढ्या वेगाने वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करता आली नाही. अशावेळी तिसर्‍या लाटेची शक्यता व्यक्त होत असताना वैद्यकीय सुविधांची व्यवस्था आतापासूनच केली गेली पाहिजे.

कोविड-19 आपल्या सर्वोच्च पातळी होता तेव्हा 1 जूनला देशभरात सक्रिय केस लोड 18 लाख होता. तेव्हा 21.74 टक्के केसमध्ये बहुतांश प्रकरणांच्या 10 राज्यांत हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची आवश्यकता भासली होती. यापैकी 2.2 टक्के लोक आयसीयूमध्ये दाखल होते.

नीती आयोगाचे म्हणणे आहे की यापेक्षा सुद्धा वाईट स्थितीसाठी आपल्याला तयार राहिले पाहिजे.
आयोगाने एका दिवसात 4 ते 5 लाख कोरोना केसचा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच म्हटले आहे
की, पुढील महिन्यात दोन लाख आयसीयू बेड तयार केले पाहिजेत. यामध्ये व्हेंटिलेटरसह 1.2 लाख आयसीयू बेड, 7 लाख विना आयसीयू हॉस्पिटलचे बेड (यापैकी 5 लाख ऑक्सीजनाचे बेड) आणि 10 लाख कोविड आयसोलेशन केयर बेड असावेत.

 

Web Title : covid 19 3rd wave niti aayog fears 4 lakh corona cases may come daily in september

 

हे देखील वाचा :

Bank Locker Rules Changed | जर वर्षातून एकवेळा बँक लॉकर उघडला नाही तर तुम्ही अडचणीत येऊ शकता, बँक उचलू शकते ‘हे’ पाऊल, जाणून घ्या

Pune Crime | पुण्याच्या पारगाव मेमाणे गावात पूर्ववैमनस्यातून गोळीबार, टोळक्यांचा गावात धुडगुस; माजवली दहशत

Modi Government | ज्येष्ठांवर मोदी सरकार मेहरबान, खर्चासाठी दर महिना मिळतील इतके हजार रुपये; जाणून घ्या

Gold Price Update | सोन्याच्या किंमतीमधील चढ-उतारामुळे ग्राहकांमध्ये गडबड, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा नवीन भाव

 

 

Related Posts