IMPIMP

FD मध्ये Investment करताना ‘या’ 10 गोष्टी जाणून घेणे आवश्यक, गुंतवणुकीवर होतो थेट परिणाम; जाणून घ्या

by nagesh
Kisan Vikas Patra | kisan vikas patra yojana double your money and get best interest on investment

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Investment | कोणत्याही योजनेत गुंतवणूक करताना आपण नेहमी काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. गुंतवणुकीसंबंधी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. म्युच्युअल फंड (mutual funds) आणि वेगाने वाढणार्‍या शेयर बाजारात गुंतवणुकीदारम्यान (Investment) आजसुद्धा एफडी (FD) गुंतवणुकीचा सर्वात पसंतीचा पर्याय आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

एफडीवर व्याजदर जरी कमी असला तरी यास गुंतवणूक आणि बचतीचा सर्वात सुरक्षित पर्याय मानली जाते. एफडीत गुंतवणूक (Investment) करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते जाणून घेवूयात…

 

 

1. कालावधी (period)
एफडी करण्यापूर्वी तिचा कालावधी ठरवा. सामान्यपणे तो 7 दिवसांपासून 10 वर्षापर्यंत असतो. हा कालावधी तुमच्या गरजा लक्षात घेवून निवडा. वेळेपूर्वी एफडी मोडल्यास व्याज उत्पन्नात नुकसान होऊ शकते.

 

2. जमा रक्कम (cash deposit)
जमा किमान रक्कम लक्षात ठेवा. SBI मध्ये ही रक्कम 1 हजार रुपये तर ICICI Bank मध्ये 10 हजार रुपये. HDFC Bank, ने ही मर्यादा 5 हजार रुपये केली आहे.

 

 

3. व्याजदर (rate of interest)
एफडीमध्ये कालावधीनुसार वेगवेगळा व्याजदर मिळतो. जमा सुरू करण्यापूर्वी हे व्याजदर तपासून घ्या. सामान्यपणे ज्येष्ठ नागरिकांना 50 बेसिक पॉईंट अतिरिक्त व्याज मिळते.

 

 

4. कर सवलत (tax benefits)
इन्कम टॅक्स स्लॅबनुसार, एफडीचे रिटर्न टॅक्स पात्र असते. जर व्याज उत्पन्न 10 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर बँक त्यावर टीडीएस कापू शकते. टीडीएस कापायचा नसेल तर बँकेत 15G/H फार्म जमा केला पाहिजे. बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये करण्यात आलेल्या पाच वर्षाच्या एफडीवर कोणताही कर लागत नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

5. वेळेपूर्वी पैसे काढणे (withdrawal before maturity)
मॅच्युरिटी कालावधी पूर्वी एफडीचे पैसे काढल्यास तुम्हाला काही रक्कम दंड म्हणून द्यावी लागेल. सामान्यपणे ही रक्कम 1 ते 1.5 टक्केच्या दरम्यान असते. काही बँका ठराविक कालवधीनंतर काढलेल्या पैशांवर दंड घेत नाहीत.

6. पेमेंट पर्याय (payment options)
मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण गुंतवलेली रक्कम, व्याजासह घेऊ शकता. सोबतच मासिक, तिमाही आणि वार्षिक आधारवर सुद्धा घेण्याचा पर्याय आहे.

7. कर्ज सुविधा (loan facility)
एफडीवर ओव्हरड्राफ्ट सुद्धा मिळू शकते. सोबतच एफडीवर कर्जसुद्धा मिळू शकते. ओव्हरड्राफ्टची रक्कम एफडीच्या रक्कमेपेक्षा कमी असते, आणि यावर व्याज जास्त असते. एफडीच्या रक्कमेच्या 90-95 टक्के भाग कर्ज म्हणून घेऊ शकता.

8. आपोआप नूतनीकरण (auto renewal)
एफडीचे दरवर्षी आपोआप नूतनीकरण होते. सध्या, जवळपास सर्व बँक एफडी उघडणे आणि आपोआप नूतनीकरणासाठी ऑनलाइन सुविधा देत आहेत.

9. नॉमिनी सुविधा (nomination facility)
एफडीवर एक किंवा एकापेक्षा जास्त व्यक्ती नॉमिनी बवू शकता.

10. सुरक्षा (security)
गुंतवणुकीच्या वेळी हे सुद्धा महत्वाचे आहे की कोणत्या बँकेत किंवा कोणत्या योजनेत तुम्ही गुंतवणूक करत आहात. संस्था किंवा स्कीम किती सुरक्षित आहे हे जाणून घ्या.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

Web Title :- Investment | investment 10 things important to know there is a direct effect on investment know the details

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात लग्नास नकार दिल्याने सर्वांसमोर 35 वर्षाच्या महिलेचा फाडला गाऊन; पुढं झालं असं काही…

UP Assembly Speaker | युपी विधानसभा अध्यक्षांचं खळबळजनक वक्तव्य; म्हणाले – ‘…तर राखी सावंत महात्मा गांधी यांच्यापेक्षाही मोठी झाली असती’

Pune Crime | किरकोळ वादातून निगडीत 5 जणांकडून एकाचा खून

 

Related Posts