IMPIMP

LIC Share Price | LIC ने आतापर्यंत गुंतवणुकदारांचे बुडवले 87,500 कोटी रुपये; ICICI Bank पेक्षा सुद्धा कमी झाली व्हॅल्यू

by nagesh
LIC Jeevan Anand Policy | भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) पॉलिसी देशात सर्वाधिक लोकप्रिय आहेत. एलआयसी विविध श्रेणींसाठी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था LIC Share Price | सरकारी विमा कंपनी एलआयसी (LIC) ला शेअर बाजारात (Share Market) लिस्ट केल्यानंतर अडचणींचा सामना करावा लागत आहे. 17 मे रोजी बाजारात डिस्काउंटवर लिस्टिंग (Discount Listing) झाल्यानंतर एलआयसीच्या शेअर्सची किंमत (LIC Share Price) बहुतांश सत्रांमध्ये घसरली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या आठवड्यात कंपनीची स्थिती अधिकच बिकट होताना दिसत आहे. शेअर्सच्या घसरणीचा थेट परिणाम कंपनीच्या व्हॅल्युएशन (LIC Valuation) वर होत आहे आणि ज्या गुंतवणूकदारांनी एलआयसीच्या IPO मध्ये पैसे लावणार्‍या गुंतवणुकदारांनी आतापर्यंत 87,500 कोटी रुपये गमावले आहेत.

 

दर्जा घसरला
लिस्टिंगनंतर, पाचव्या सर्वात मोठ्या कंपनीचा दर्जा मिळालेल्या LIC चे मूल्य आता ICICI बँकेच्या MCap पेक्षा कमी झाले आहे.

 

एलआयसीचे शेअर्स ’ऑल टाइम लो’ जवळ
बुधवारी एलआयसीचा शेअर बीएसई (BSE) वर घसरण होऊन 810.55 रुपयांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान, तो एकावेळी 817 रुपयांपर्यंत वाढला आणि 808.55 रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला. एलआयसीची ऑल टाइम लो (LIC All Time Low) लेव्हल 801.55 रुपये आहे. (LIC Share Price)

 

या घसरणीनंतर एलआयसीचे मूल्य 5,12,672.69 कोटी रुपयांवर आले. हे ICICI बँकेच्या 5,23,353.87 कोटी रुपयांच्या मार्केट कॅपपेक्षा कमी आहे. यासह, मूल्यांकनाच्या बाबतीत, एलआयसी आता सातव्या क्रमांकाची कंपनी बनली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आतापर्यंत इतका घसरला एलआयसीचा स्टॉक
LIC च्या IPO साठी 902-949 रुपयांचा प्राईस बँड निश्चित करण्यात आला होता. अपर प्राइस बँड (LIC IPO Price Band) नुसार कंपनीचे मूल्य 6,00,242 कोटी रुपये होते.

 

सध्या तिचे एमकॅप 5,12,672.69 कोटी रुपये झाले आहे. अशा प्रकारे, LIC IPO च्या गुंतवणूकदारांचे आतापर्यंत 87,569.31 कोटी रुपयांचे बुडाले आहेत.

 

पहिल्याच दिवशी, एलआयसीचा शेअर 13 टक्क्यांपर्यंत घसरला होता आणि शेवटी तो 8.62 टक्क्यांनी म्हणजेच 81.80 रुपयांनी 867.20 रुपयांवर स्थिरावला होता. आत्तापर्यंत, इश्यू किमतीच्या तुलनेत तो सुमारे 15 टक्क्यांनी घसरला आहे.

 

एलआयसीने गुंतवणुकीतून कमावले ’इतके’ हजार कोटी
याआधी मंगळवारी कंपनीने सांगितले की 2021-22 (एलआयसी प्रॉफिट बुकिंग) मध्ये स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीतून त्यांनी 42,000 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गेल्या वर्षीच्या 36,000 कोटी रुपयांच्या नफ्यापेक्षा हा नफा जास्त आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राज कुमार (LIC MD Raj Kumar) यांनी सांगितले होते की एलआयसी सध्या सुमारे 42 ट्रिलियन रुपयांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करत आहे आणि देशातील सर्वात मोठी असेट मॅनेजर (Asset Manager) आहे.

याशिवाय एलआयसी ही देशांतर्गत शेअर बाजारातील सर्वात मोठी गुंतवणूकदार आहे. कंपनी कंपनीच्या मालमत्तेपैकी सुमारे 25 टक्के शेअर बाजारात गुंतवणूक करते.

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे.
हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते.
त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- LIC Share Price | lic share falling investors looses 87500 crores mcap valuation now lower than icici bank

 

हे देखील वाचा :

Restaurant Service Charges | रेस्टॉरंटमध्ये खाणार्‍यांसाठी खुशखबर, सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे स्वस्त झाले लंच-डिनर

Pune PMC News | महापालिका कंत्राटी सुरक्षा रक्षक तीन महिन्यांपासून वेतनाविनाच; पालिकेतील सत्ताधार्‍यांनी नेत्याच्या कंपनीचे पुरविलेले ‘लाड’ कष्टकर्‍यांच्या मुळावर

MNS Chief Raj Thackeray | पत्रातून ‘राज’गर्जना ! ‘मशिदीवरील भोंग्याचा विषय आता कायमचा संपवायचा’

 

Related Posts