IMPIMP

MNS Chief Raj Thackeray | पत्रातून ‘राज’गर्जना ! ‘मशिदीवरील भोंग्याचा विषय आता कायमचा संपवायचा’

by nagesh
Raj Thackeray | mns leader raj thackeray comment on maharshtra politicis raj thackeray konkan tour

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MNS Chief Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सध्या कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तरी त्यांच्या पायावरील शस्त्रक्रिया असल्यानं त्यांना दोन महिने आराम करावे लागणार आहे. त्यामुळे मशिदीवरील भोंग्यांचा विषय शांत झाला आहे का ? अशा चर्चा होत असतानाच आता पुन्हा एकदा पत्रातून ‘राज’गर्जना होताना दिसत आहे. ‘मशिदीवरील भोंग्याचा निकाल लावायचाय, कामाला लागा’, असे राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकारी – कार्यकर्त्यांना आदेश दिला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

“माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय़ आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यां पर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा.” असं राज ठाकरेंनी (MNS Chief Raj Thackeray) पत्रात म्हटलं आहे,

 

 

पुढे ते म्हणतात, “तुम्ही एकच करायचं आहे – माझं पत्र तुम्ही राहत्या परिसरातील घराघरात स्वत: नेऊन द्यायचं आहे.
कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही.
मला खात्री आहे; जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही.” असं ते म्हणाले. राज्यात भोंग्याबाबत जनजागृती करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांना प्रत्येक घराघरात जाऊन पत्र देण्याच्या सूचना राज ठाकरेंकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता वातावरणात आणखी चर्चा रंगताना दिसणार हे नक्कीच.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | mns chief raj thackeray the issue of loudspeaker should be stopped forever raj thackerays letter to party workers

 

हे देखील वाचा :

Pune Crime | घरात गांजाचा साठा करुन विक्री करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक

PAN-Aadhaar Linking | 1 जुलैनंतर पॅन-आधार लिंक करणे पडणार महागात, आत्ताच करा लिंक; जाणून घ्या सोपी पद्धत

Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी भर ! CBI ने दाखल केले आरोपपत्र

 

Related Posts