IMPIMP

T20 World Cup 2022 Schedule | पुढील T-20 वर्ल्ड कपच्या तारखा झाल्या जाहीर; जाणून घ्या कोणत्या संघाना मिळाली थेट ‘एंट्री’

by nagesh
T20 World Cup 2022 Schedule | t20 world cup 2022 kick october 16 australia aim defend title home check full schedule here marathi news

नवी दिल्ली : वृत्तसंस्था T20 World Cup 2022 Schedule | ऑस्ट्रेलियन (Australia) संघानं दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर इतिहास रचत पहिल्यांदाच T-20 वर्ल्ड कपचे (T20 World Cup) विजेतेपद पटकावले आहे. यामध्ये त्यांनी अंतिम सामन्यात बलाढ्य न्यूझीलंड (New Zealand) संघावर मात करत हे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. हा सामना ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्स राखून जिंकला होता. पण, आता ऑस्ट्रेलियाची खरी कसोटी लागणार आहे, कारण पुढील T-20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियातच होणार आहे. त्यांच्यासमोर जेतेपद कायम राखण्याचे आव्हान आहे आणि ICC नं आज पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपच्या तारखा (T20 World Cup 2022 Schedule) सोमवारी जाहीर केल्या आहेत.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

T-20 वर्ल्ड कप स्पर्धा 2020 मध्ये ऑस्ट्रेलियात होणार होती, परंतु कोरोना व्हायरसमुळे ( Corona Virus) ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती.
यानंतर 2022 च्या स्पर्धा आयोजनाचा मान ऑस्ट्रेलियाला दिला गेला. ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबर 2022 ते 13 नोव्हेंबर 2022 या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत एकूण 45 सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अ‍ॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे 9 व 10 नोव्हेंबरला खेळवण्यात येईल तर मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर 13 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

पुढील वर्षी होणाऱ्या T-20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलिया,न्यूझीलंड,अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, भारत, पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका या संघाना थेट सुपर 12 मध्ये प्रवेश मिळाला आहे.

तर नामिबिया, स्कॉटलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांना पहिल्या राऊंडमध्ये खेळावे लागणार आहे.
ओमान आणि झिम्बाब्वे येथे दोन पात्रता स्पर्धा होणार आहेत.
यामधून निवडण्यात आलेले संघ आणि पहिल्या फेरीतील संघ सुपर 12 मध्ये पोहोचण्यासाठी एकमेकांना आव्हान देतील.

 

Web Title: T20 World Cup 2022 Schedule | t20 world cup 2022 kick october 16 australia aim defend title home check full schedule here marathi news

 

हे देखील वाचा :

Urfi javed | नेटच्या कपड्यांमुळे उर्फी जावेदची काळी ब्रालेट झाली फ्लाॅन्ट, पाहा उर्फीचे हाॅट फोटो

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांचा ‘हा’ विश्वासनीय स्टॉक तुम्हाला बनवू शकतो लखपती, एका शेयरची किंमत केवळ 98 रुपये

Sushant Singh Rajput | दुर्देवी ! सुशांत सिंह राजपूतच्या 4 नातेवाईकांचा कार अपघातात मृत्यू

 

Related Posts