IMPIMP

Vedika Shinde | 16 कोटींचे इंजेक्शन दिलेल्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या वेदिका शिंदेचा मृत्यु

by nagesh
edika Shinde dies after injecting Rs 16 crore

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Vedika Shinde |दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या भोसरीतील (Bhosari) चिमुकल्या वेदिका सौरव शिंदे (Vedika Sourav Shinde) यांचा आज पहाटे दुदैवी मृत्यु (Death) झाला. तिला लोकवर्गणीतून तब्बल १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन (Injection) दिले होते. त्यानंतर ती बरी होऊन घरी आली होती. मात्र, रविवारी सायंकाळी खेळत असताना तिला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला खासगी रुग्णालयात (Private Hospital) नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान पहाटे तिचा मृत्यु झाला. १६ कोटी रुपये जमविण्यासाठी तिच्या आईवडिलांनी जीवाचे रान केले होते. त्याला काही दिवसांपुरतेच यश आले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

वेदिका शिंदे (Vedika Shinde) हिला एसएसए१ (SSA 1) हा जेनेटिक आनुवांशिक आजार (Genetic Genetic Disease) होता. दहा हजारांमध्ये तो एखाद्या मुलाला होतो. पुढे न्युमोनिया (Pneumonia) होऊन मूल दगावू शकते. काही महिन्यांपूर्वी वेदिका हिला हा आजार झाल्याचे समजले होते. त्यानंतर वेदिकाचे वडिल सौरव शिंदे, (Sourav Shinde) तिची आई व आजोबांनी तिच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन केले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यातून १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन अमेरिकेतून मागविण्यात आल. ख़ासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी लोकसभेत आवाज उठवून त्यावरील सीमा शुल्क माफ करण्याची मागणी केली. केंद्र शासनाने (Central Government) आयात कर रद्द केला.

 

 

गेल्या महिन्यातच पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये (Private Hospital) तिला हे इंजेक्शन देऊन उपचार करण्यात आले होते.
त्यानंतर वेदिका पूर्ण बरी होऊन घरी गेली होती.
मात्र, शिंदे कुटुंबियांचा हा आनंद अल्पकाळच टिकला.

 

 

Web Title : Vedika Shinde dies after injecting Rs 16 crore

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | संजय राऊतांचा केंद्रीय मंत्री नारायण राणेंना टोला, म्हणाले…

Crime News | अनोळखी महिलेला तरुणानं मारली घट्ट मिठी; दादर रेल्वे स्टेशनवरील विचित्र प्रकार समोर

Monsoon And Covid | ‘कोरोना’ आणि ‘मान्सून’संबंधी आजार कसे ओळखाल? जाणून घ्या तज्ज्ञांचं म्हणणं

 

Related Posts