IMPIMP

Ahmednagar Crime | 10 वी, 12 वीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण आग

by nagesh
Ahmednagar Crime | 10th and 12th question papers were burnt tempo caught fire in chandanpuri ghat of ahmednagar

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइन Ahmednagar Crime | पुणे – नाशिक महामार्गावरील (Pune-Nashik Highway) संगमनेर तालुक्यातील (Sangamner) चंदनापुरी घाटात (Chandanapuri Ghat) बुधवारी पहाटे १० वी व १२ वी च्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण आग लागली. दरम्यान, महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. हा टेम्पो भोपाळ (Bhopal) वरून पुण्याकडे (Pune) येत असताना ही दुर्घटना घडली असून ‘द बर्निंग’ टेम्पो (The Burning Tempo) थरार येणाऱ्या – जाणाऱ्या वाहनचालकांनी अनुभवला. (Ahmednagar Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत महामार्ग पोलिसांनी (Highway Police) दिलेली माहिती अशी की, चालक मनीष चौरसिया व मॅनेजर रामविलास राजपूत हे टेम्पो क्रमांक एम. पी . ३६ एच. ०७९५ मधून भोपाळ येथून पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन पुण्याला येत होते. बुधवारी पहाटे टेम्पो चंदनापुरी घाटात हॉटेल साईप्रसादच्या समोर आला असता पाठीमागच्या बाजूने अचानक पेटला. मागच्या बाजूने अचानक आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा केला. मनीष चौरसिया व रामविलास राजपूत यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण ते प्रयत्न अपुरे पडत असल्याचे लक्षात आले. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख घटनास्थळी दाखल झाले. (Ahmednagar Crime)

 

त्यापाठोपाठ संगमनेर नगर परिषद आणि संगमनेर साखर कारखान्याचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग विझवली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नसून नाशिक – पुणे वाहतूक काही काळासाठी जुन्या घाटातून चालू आहे. पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन येणाऱ्या टेम्पोला आग लागल्याचे समजताच शिक्षणाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

Web Title :- Ahmednagar Crime | 10th and 12th question papers were burnt tempo caught fire in chandanpuri ghat of ahmednagar

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरातील चाफळकर कॉलनीतील भल्या पहाटे थरार ! चोरट्यांकडून पोलिसांवर दगडफेक, पोलिसांचा स्वसंरक्षणार्थ गोळीबार

Pune Crime | ‘मटका किंग’च्या खून प्रकरणी पुण्यातील भाजपच्या ‘गोल्डन मॅन’ला अटक; प्रचंड खळबळ

National Pension Scheme (NPS) | पत्नीच्या नावावर उघडा स्पेशल अकाऊंट, केवळ रू. 5000 ची गुंतवणूक ! मिळतील रू. 1,11,98,471; दरमहिना रू. 44,793 चा पेन्शनचा सुद्धा लाभ

 

Related Posts