IMPIMP

50000 ची लाच घेताना उत्पादन शुल्कच्या निरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

by omkar
Anti-Corruption Bureau

बीडः सरकारसत्ता ऑनलाइन – गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी 50 हजाराची लाच स्विकारताना बीड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाला एसीबीने (ACB) सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. एसीबीने बुधवारी (दि. 2) दुपारी ही कारवाई केली असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, जाणून घ्या

दत्तात्रय लक्ष्मण दिंडकर (वय 40) असे अटक केलेल्या लाचखोर निरीक्षकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, आरोपी दिंडकर यांने तक्रारदाराविरोधात दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच गुन्ह्यातून कमी करण्यासाठी तक्रारदाराकडे 75 हजाराची लाच मागिती होती. पण तडजोडी अंती 50 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तर दुसरीकडे तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार केली होती. त्यानुसार एसीबीने बुधवारी दुपारी बीड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात सापळा रचून आरोपी दिंडकर याला 50 हजार रुपयांची लाच स्विकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले.

औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) पोलीस अधिक्षक डॉ. राहुल खाडे, प्रभारी अप्पर पोलीस अधिक्षक मारुती पंडीत. पोलीस उपनिरीक्षक ब्रम्हदेव गावडे, याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास घनवट, पोलीस अंमलदार मिलींद इणर, रविद्र काळे, भूषण देसाई, चंद्रकांत शिंदे आदीनी ही कारवाई केली.

Also Read:- 

Coronavirus : अमेरिकन ‘महामारी’ तज्ज्ञ अँथनी फाउची आणि बिल गेट्स यांच्यावर संशय ! चीनी शास्त्रज्ञा सोबत चर्चा? ईमेल ‘लीक’

मुंबईच्या दहिसर पूर्वमध्ये प्रियकराच्या मदतीनं तिनं केली नवर्‍याची हत्या, स्वयंपाक घरात पुरलेल्या मृतदेहाचं ‘गौडबंगाल’ 6 वर्षाच्या मुलीनं सांगितलं

Kadha In Summer : उन्हाळयात काढा पिण्याने नुकसान होऊ शकते का? जाणून घ्या

दोनशे जणांची 7.14 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी ‘आदर्शनागरी’ च्या अध्यक्षा सुनीता नाईक यांना अटक

पुण्यातील देहुरोडमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार ! व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन सामुहिक बलात्कार

जाणून घ्या 3 जूनचे राशिफळ

अ‍ॅलोपॅथीनंतरआता बाबा रामदेव यांचा ज्योतिषांवर निशाणा, म्हणाले…

‘राजकारणात काहीही घडू शकतं’ ! राज ठाकरेंच्या विधानावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

Related Posts