IMPIMP

Aryan Khan Drug Case | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील NCB चा साक्षीदार किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात; गुन्हे शाखेनं पकडलं

by nagesh
Kiran Gosavi | NCB Punch in Aryan Khan Drugs Case Kiran Gosavi's female accomplice Kusum gaikwad from Dubai arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Drug Case) एनसीबीकडून साक्षीदार करण्यात आलेल्या व पुण्यासह अनेक शहरात फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या किरण गोसावी (Kiran Gosavi) हा अखेर पुणे पोलिसांच्या (Pune Police) ताब्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलीस त्याच्या मागावर होते. गुन्हे शाखेने (Crime Branch) त्याला ताब्यात घेतले असून सध्या त्याच्या अटकेची (Aryan Khan Drug Case) प्रक्रिया सुरु आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

किरण गोसावी याने आर्यन खानबरोबरचा (Aryan Khan Drug Case) फोटो व्हायरल केल्यानंतर तो चर्चेत आला होता. त्यानंतर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल असून त्यात तो फरार असल्याचे समोर आले होते.

 

 

त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस (Lookout Notice) काढली होती.
त्याचा शोध घेण्यासाठी ३ पथके तयार करण्यात आली होती.
त्याचा शोध घेत असताना तो लखनौ येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पुणे पोलिसांचे पथक लखनौला जाऊन धडकले होते.
परंतु, हे पथक पोहचण्यापूर्वीच किरण गोसावी तेथून फरार झाला होता.
याप्रकरणी चिन्मय देशमुख यांनी फिर्याद दिली आहे.

किरण गोसावी याने आपल्या फेसबुकवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी अशी पोस्ट टाकली होती.
त्याला चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता.
त्यांच्याकडून ३ लाख रुपये घेऊन किरण गोसावी याने मलेशियाला पाठविले.
मात्र, तेथे नोकरी न दिल्याने ते भारतात परत आले.
त्यानंतर त्यांनी फरासखाना पोलिसांकडे (Faraskhana Police Station) फिर्याद दिली होती.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पुणे पोलिसांनी त्याच्या महिला मॅनेजरला अटक केली आहे.  शेरबानो मोहम्मद इरफान कुरेशी (वय २७, रा. गोवंडी, मुंबई) असे तिचे नाव आहे. चिन्मय देशमुख याचे पैसे तिच्या खात्यात जमा झाले होते. किरण गोसावी याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

 

Web Title: Aryan Khan Drug Case | Pune Police Crime Branch has been detained Kiran Gosavi (NCB witness in the drugs on cruise matter) CP Amitabh Gupta (Pune Police Commissioner)

 

हे देखील वाचा :

School Diwali Holiday | महाराष्ट्रातील शाळांना शिक्षणमंत्र्यांकडून दिवाळीची सुट्टी जाहीर

Maharashtra Cabinet Decision | महानगरपालिका, नगरपरिषदांमधील सदस्य संख्येबाबत मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

Nawab Malik | नवाब मलिकांना रोखण्यासाठी याचिका, ‘या’ विनंतीवर हायकोर्ट म्हणाले…

 

Related Posts