IMPIMP

Crime News | 4 वर्षाच्या मुलाने घरासमोर लघवी केल्यानं शेजारी भडकला, अल्पवयीन मुलाने वस्तऱ्याने सपासप वार करुन चिमुकल्याच्या आईचा निर्घृण खून

by nagesh
Pune Pimpri Crime | seven minor boys murdered friend in pimpri chinchwad of pune

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– Crime News | शुल्लक कारणावरून एका चार वर्षाच्या चिमुकल्याच्या आईचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन खून केल्याची घटना दिल्लीत (Murder In Delhi) उघडकीस आली आहे. ही घटना राजधानी दिल्लीच्या (Crime News) अमन विहारमध्ये घडली आहे. चार वर्षाच्या चिमुरड्याने शेजाऱ्याच्या घरासमोर लघवी (Urine) केली. यामुळे चिडलेल्या अल्पवयीन मुलाने वस्तऱ्याने महिलेवर सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावित्री राणा Savitri Rana (वय-33 रा. अमन विहार, दिल्ली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. काही दिवसापूर्वी राणा यांच्या चार वर्षाच्या मुलानं शेजाऱ्याच्या घरासमोर लघवी केली होती. यावरुन राणा आणि शेजाऱ्यांमध्ये वाद (Argument) झाला होता. या वादात आरोपी अल्पवयीन मुलगा देखील होता. हा वाद जवळच्या दुकानदारांनी आणि शेजाऱ्यांनी मिटवला होता.

 

लोकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला, परंतु तो पूर्णपणे संपला नाही. 11 ऑगस्टच्या रात्री साडेअकराच्या सुमारास अल्पवयीन मुलाने महिलेवर वस्तऱ्याने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. दिल्ली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

Web Title : crime news | minor boy killed his woman neighbor due to small dispute

 

हे देखील वाचा :

Delta Plus Variant | मुंबईत 60 वर्षीय महिलेचा डेल्टा प्लसने मृत्यू; आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’

Pune Corporation | नगरसेवकांच्या निष्क्रियतेमुळे पुणे महापालिकेचे वार्षिक 60 लाखांचे नुकसान

Pune Crime | इमारत निधी न दिल्याने विद्यार्थ्याला मारहाण ! मुख्याध्यापकासह शिक्षक, क्लार्कवर गुन्हा दाखल

 

Related Posts