IMPIMP

Pune Crime | इमारत निधी न दिल्याने विद्यार्थ्याला मारहाण ! मुख्याध्यापकासह शिक्षक, क्लार्कवर गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | Thieves attack DSK Dreamcity security guards in Pune!

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | दहावीचा निकाल आणण्यासाठी शाळेत गेलेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी इमारत निधी न दिल्याने विद्यार्थ्याला मारहाण करुन दमदाटी करण्याचा प्रकार शिरुर (Shirur) तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी गावात घडला. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी (shikrapur police) मुख्याधापक, शिक्षक व क्लार्क अशा तिघांविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मुख्याध्यापक रमेश चव्हाण, शिक्षक वाळके आणि क्लार्क संभाजी आनंदराव लांडगे अशी गुन्हा (FIR) दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना निमगाव म्हाळुंगी गावातील विद्या विकास मंदिर या शाळेत गुरुवारी सकाळी 10 वाजता घडली. याबाबत एका 43 वर्षाच्या शेतकर्‍याने फिर्याद दिली आहे. त्यांचा 16 वर्षाचा मुलगा विद्या विकास मंदिर शाळेत (Vidya Vikas Mandir School) दहावीला होता. शाळेच्या इमारतीच्या नावाखाली बेकायदेशीरपणे जबरदस्तीने निधी गोळा केला जात होता. तो या शेतकर्‍याने दिला नव्हता. त्यामुळे त्यांचा मुलगा शाळेत गेल्यावर त्याला 10 वीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र व शाळा सोडल्याचा दाखला क्लार्क संभाजी लांडगे याने देण्यास नकार दिला होता. ही बाब मुलाने वडिलांना सांगितले. हे लांडगे याला समजल्यावर त्याने चिडुन जाऊन फिर्यादीच्या मुलाला हाताने मारहाण केली. या प्रकाराची तक्रार देण्यासाठी फिर्यादी मुख्याध्यापक रमेश चव्हाण यांच्याकडे गेले. तेव्हा त्यांनी फिर्यादी यांना दमदाटी केली. पोलीस निरीक्षक गेडगे तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Student beaten up for non-payment of building funds! Teacher along with headmaster, case filed against clerk

 

हे देखील वाचा :

Pune News | काय सांगता ! होय, …म्हणून पुण्यातील ‘या’ ग्रामपंचायतीनं गावभर वाटले कंडोम

Parambir Singh | परमबीर सिंग यांच्याविरोधात ‘लूकआउट’ नोटीस जारी

Asteroid | पृथ्वीवर विध्वंस करू शकतो अ‍ॅस्टरॉईड बेन्नू, NASA ने सांगितले केव्हा होऊ शकते ‘धडक’

RBI Issued Fraud Alert | तुम्ही देखील ‘हे’ नंबर कोणासोबत शेअर केलेत? तर मग व्हा सावध, RBI नं जारी केला अलर्ट; जाणून घ्या

 

Related Posts