IMPIMP

Drug Mafia Rubina Shaikh | ड्रग माफियांचे मालेगाव कनेक्शन उघड; रुबीना शेखची २ कोटींची मालमत्ता

by nagesh
Mumbai Crime | mumbai police anti narcotic cell exposed drugs racket in mumbai seized 21 crore worth heroin woman arrested

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन Drug Mafia Rubina Shaikh | मुंबई नार्को टेस्ट विभागाने (anti narcotics cell mumbai) झोपडपट्ट्यांमधील अमली पदार्थ विक्री रोखण्यासाठी छापे घातले होते. तपासणी दरम्यान रुबीना शेख (Drug Mafia Rubina Shaikh) हिचे नावासमोर आले. तिला गुजरातमधील उंझाजवळील मीरादातार (mira datar unjha gujarat) येथून अटक करण्यात आले होते. तपासामध्ये ड्रग माफियांचे मालेगाव कनेक्शन उघड झाले असून मालेगावमध्ये (malegaon) रुबिनाचे ३ बंगले, फार्महाऊस अशी सुमारे २ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, रुबिनाचा बॉस निलोफर सांडोले (Nilofer Sandole) हा फरार आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

राज्यातील विविध शहरांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये रुबिना  हस्तकांमार्फत ड्रग पुरवित होती. पैसे जास्त मिळू लागल्याने तिने हाच मुख्य व्यवसाय केला. ड्रग व्यवसायात रुबिनाचा दबदबा वाढल्याने मालेगावी तीन बंगले व इतर मालमत्ता जमविल्याचे समोर आले आहे. तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे ती म्हणजे मालेगाव शहरात कुत्ता गोळी व अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. हीच बाब हेरून रुबीना शेखने मालेगावात पाळेमुळे रोवले. त्यामुळे आता स्थानिक पोलिसांपुढे ड्रग्स माफियांचे मालेगाव कनेक्शन शोधण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. रुबिनाने जमविलेली मालमत्ता पाहून सर्वांनाच आचंबित केले आहे. दरम्यान, पोलिसांनी तिची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर यामध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का? याचाही शोध घेतला जात आहे.

 

Web Title : Drug Mafia Rubina Shaikh | drug mafia rubina sheikh has malegaon connection having farmhouse and 2 crore property

 

हे देखील वाचा :

Indian Post Recruitment | 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! टपाल विभागात 266 पदांवर भरती; जाणून घ्या

Share Market Update | सरकारी कंपन्यांमध्ये ‘बंपर’ कमाईची ‘सुवर्ण’संधी; जाणून घ्या कारण

Railway Recruitment 2021 | 10 वी पास असणार्‍या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! तब्बल 3366 जागांसाठी मेगा भरती; जाणून घ्या प्रक्रिया

 

Related Posts