IMPIMP

Kolhapur Crime | धक्कादायक ! फोटो एडीटींगद्वारे बनवला अश्‍लिल ‘Video’; धमकी देत तरुणाकडून उकळले 45 हजार रुपये

by nagesh
Pune Crime News | Detectives managed to secretly photograph a woman in Koregaon Park; The police laid a trap and arrested him

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Kolhapur Crime | कोरोनाच्या महामारीत ऑनलाइनच्या माध्यमातून फसवणुक झाल्याचे अनेक प्रकार समोर आलेत. त्यामुळे सायबर पोलिसांकडून सावधानतेच्या सुचना देखील देण्यात आल्या. मात्र अशा घटना घडतानाच दिसत आहेत. अशीच घटना कोल्हापूरात (Kolhapur Crime) घडली आहे. शाहूनगर परिसरात राहणार्‍या एका युवकाच्या फेसबुक अकाऊंटवरील फोटोचा वापर करत अश्‍लिल व्‍हीडीओ (Pornographic videos) तयार करुन 45 हजार रुपये खंडणी उकळल्‍याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी व्‍हीडीओ व्‍हायरल करण्‍याची धमकी देणार्‍या संशयित राहूल यादव (Rahul Yadav) नामक तरुणाविरोधात राजारामपुरी पोलिसांत गुन्‍हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, एका नामांकित कंपनीत काम करणार्‍या युवकाला एका अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. संशयिताने त्‍याला तुम्‍हाला
फ्रेन्‍डशीपसाठी मुली हव्‍या आहेत का अशी विचारणा देखील केली होती. दरम्यान, फिर्यादी युवकाने नकार दिला. मात्र, आरोपीकडून खाते हॅक करण्‍याची धमकी देत पैशाची मागणी करण्‍यात आली. यालाही फिर्यादीने प्रतिसाद दिला नव्‍हता. (Kolhapur Crime)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

दरम्‍यान, संशयिताने फिर्यादी तरुणाच्‍या पत्‍नीच्‍या फेसबुकवरील काही फोटो मिळवले.
या फोटोचा वापर करुन फिर्यादी तरुणाचा अश्‍लिल फोटो आणि व्‍हीडीओ (videos) क्‍लिप तयार करुन ती मोबाईलवर पाठवली. याबदल्‍यात वेळोवेळी 45 हजार रुपये खंडणी उकळल्‍याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे. याप्रकरणा विरोधात राजारामपुरी पोलिसांत (Rajarampuri Police Station) गुन्‍हा दाखल झाला आहे. याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्‍याचे पोलिस निरीक्षक ईश्‍वर ओमासे (PI Ishwar Omase) हे सायबर पोलिसांच्‍या मदतीने संशयिताचा शोध घेत आहेत.

 

Web Title: Kolhapur Crime | videos created by photo editing in kolhapur

 

हे देखील वाचा :

Pune Crime | तीनपत्ती खेळाच्या वादातून तरुणाचा निर्घृण खून, पिंपरीत प्रचंड खळबळ

Legislative Council elections | भाजपकडून चित्रा वाघ यांना विधानपरिषदेची उमेदवारी?

Amla Benefits | हिवाळ्यासाठी सुपरफूड आहे आवळा, जाणून घ्या खाण्याचे 7 जबरदस्त फायदे

 

Related Posts