पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | सकाळच्या वेळी दुध अथवा काही कामासाठी लोक दरवाजा लोटून घराबाहेर गेल्याचे पाहून तो आत शिरायचा आणि कोणाला काही समजायच्या आत घरात चर्जिंगला लावलेले अथवा ठेवलेले मोबाईल घेऊन लंपास व्हायचा. गेल्या काही दिवसांमध्ये त्याने शहराच्या विविध भागातून तब्बल २२ मोबाईल हँडसेट चोरले होते. मात्र, एके ठिकाणी तो CCTV मध्ये कैद झाला आणि त्यांचा हा कारनामा (Pune Crime) उघडकीस आला. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट १ च्या पथकाने त्याचा शोध घेऊन जेरबंद केले.
मुरली नागराज (वय ३५, रा. नागोरी, जि़ शिमोगा, कर्नाटक) असे या चोरट्याचे नाव आहे. शुक्रवार पेठेतील भरत राज पुरोहित यांच्या घरातून व त्यांच्या सहकार्यांच्या घरातून मोबाईल चोरीला गेले होते. या ठिकाणी तपास करीत असताना विश्रामबाग पोलीस ठाण्याचे (Vishrambaug Police Station) पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे (PSI Rakesh Sarde) यांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्यात मोबाईल चोरी करणारा चोरटा कैद झाला होता. त्यावरुन आरोपीचा शोध सुरु केला. खास बातमीदाराकडून त्यांना माहिती मिळाली की, हा मोबाईल चोरटा कात्रज येथील संतोषनगर (Santosh Nagar, Katraj) परिसरात थांबला आहे. त्यानुसार पोलीस पथकाने संतोषनगर परिसरात त्याचा शोध सुरु केला.
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update
तेव्हा तो पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडले. त्यांच्याकडून तब्बल २२ मोबाईल हँडसेट हस्तगत करण्यात आले आहेत. हे मोबाईल त्याने विश्रामबाग, भारती विद्यापीठ (Bharti Vidyapeeth Police Station), वारजे पोलीस ठाण्याच्या (Warje Malwadi Police Station) परिसरातील गेल्या काही दिवसांमध्ये चोरले होते.
नागराज हा मुळचा कर्नाटकातील शिमोगा येथील राहणारा असून काही दिवसांपूर्वीच तो गावावरुन पुण्यात आला होता.
आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने तो चोर्या करीत असे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल माने (Police Inspector Sunil Mane)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे, कर्मचारी संजय दगडे, शरद वाकसे, हेमंत पालांडे, सताप्पा पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
Web Title :- Pune Crime | Captured in CCTV for ‘disappearing’ mobile phones of those who went out for milk in Pune! 22 mobile handsets recover vishrambaug police station Bharti Vidyapeeth police station and warje malwadi police station pune police crime branch
- Wedding Cost Cutting | कमी खर्चात करायचंय का लग्न? ‘या’ 7 ट्रिक वाचवतील तुमचा पैसा; जाणून घ्या
- Sameer Wankhede | समीर वानखेडेंच्या लग्नपत्रिकेत वडिलांचे नाव दाऊद; निलोफर मलिक यांनी शेअर केली लग्न पत्रिका
- Pollution Side Effects | फुफ्फुसे डॅमेज करते प्रदूषण, खाण्याच्या ‘या’ 8 गोष्टींनी होईल बचाव; जाणून घ्या