IMPIMP

Pune Crime | मिलिंद एकबोटे, नंदकिशोर एकबोटे यांना अटकपूर्व जामीन मंजूर, पण…

by nagesh
Pune Crime | Milind Ekbote Nandkishore Ekbote granted pre-arrest bail but barred from entering Pune Municipal Corporation area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | दिशाभूल करणारी पत्रके वाटून दोन समाजात तेढ, द्वेष निर्माण व्हावा, यासाठी प्रयत्न केल्याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) समस्त हिंदू आघाडीचे (Chief of Samast Hindu Aghadi) मिलिंद रमाकांत एकबोटे (Milind Ramakant Ekbote) आणि नंदकिशोर रमाकांत एकबोटे (Nandkishore Ramakant Ekbote) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह 20 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात त्यांचा अटक पूर्व जामीन अर्ज (Pre-Arrest Bail Application) अतिरिक्त सत्र न्यायालयाने मंजूर (Additional Sessions Court) केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शरयू सहारे (Judge Sharyu Sahare) यांनी एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करताना त्यांना पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) क्षेत्रात प्रवेश न करण्याची अट घातली आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मिलिंद एकबोटे (वय – 65 रा. रेव्ह्यून्यू कॉलनी, शिवाजीनगर) व नंदकिशोर एकबोटे (वय – 60 रा. शिवाजी नगर) यांच्याविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात आयपीसी 120 (ब), 295अ, 143, 145, 149, 188, 505 (2), माहिती तंत्रज्ञान अधिनियम (Information Technology Act), महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत (Maharashtra Police Act) 20 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी एकबोटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. (Pune Crime)

 

अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करताना न्यायालयाने घातलेली अट रद्द करण्यासाठी नंदकिशोर एकबोटे यांनी अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी झाली. यावेळी तपास अधिकारी (Investigating Officer), सरकारी वकील व आरोपींचे वकील यांचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने बुधवारी (दि.4) नंदकिशोर एकबोटे यांचा अर्ज फेटाळून लावला. तसेच त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करताना दोन्ही आरोपींना गुन्ह्याचे दोषारोपत्र (Charge Sheet) दाखल होत नाही तो पर्यंत पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत प्रवेश करता येणार नसल्याची अट कायम ठेवली.

 

 

Web Title :- Pune Crime | Milind Ekbote Nandkishore Ekbote granted pre-arrest bail but barred from entering Pune Municipal Corporation area

 

हे देखील वाचा :

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ ! बीड कोर्टाचं अजामीनपात्र वॉरंट जारी&

Pune Crime | लग्नासाठी वेळ मागून घेतल्याने अश्लील फोटो आईवडिलांना पाठवून केली बदनामी; जळगावमधील तरुणावर कोंढवा पोलिसांनी केला गुन्हा दाखल

MLA Ravi Rana On Thackeray Government | रवी राणांचा ठाकरे सरकारवर घणाघात; म्हणाले – ‘बजरंग भक्त अन् राम भक्त त्यांना धडा शिकवतील’

;

Related Posts