IMPIMP

Pune Crime News | पुणे-सिंहगड रोड क्राईम न्यूज : ग्रीनफिल्ड रेस्टोबारच्या दोघांवर गुंडांकडून हत्याराने सपासप वार, खुनी हल्ला करणारे तिघे ताब्यात

by nagesh
Pune Crime News | Pune-Singhgad Road Crime News: Two of Greenfield Restobar were attacked by criminals, pune police arrest three

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | वडगाव खुर्दच्या अग्निशमन केंद्राच्या जवळ असलेल्या ग्रीनफिल्ड रेस्टोबार व फॅमिली
गार्डनच्या (Greenfield Resto Bar in Vadgaon Dhayari, Pune) दोघांवर गुंडांच्या टोळक्याने धारदार हत्याराने सपासप वार केल्याची घटना
शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यासह इतर सात ते
आठ जणांविरूध्द खुनाच्या प्रयत्नाचा (Attempt To Murder) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी भेट दिली
आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सुहास सुभाषचंद्र हेगडे (33, रा. एन/6, सेक्करेड हॉटी टाऊन, जगताप चौक, वानवडी, पुणे) आणि रेस्टो बारमधील वेटर आसीक मंडल यांच्यावर धारदार हत्याराने सपासप वार करण्यात आले आहेत. ते दोघेही जखमी आहेत. हेगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिंहगड रोड पोलिसांनी सुमित शेजवळ, मदनराज गेटयाल, यश शेजवळ यांना ताब्यात घेतले आहे तर त्यांच्या इतर 7 ते 8 साथीदारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सुहास सुभाषचंद्र हेगडे हे त्यांचे ग्रीनफिल्ड रेस्टोबार व फॅमिली गार्डन हे हॉटेल शनिवारी मध्यरात्री बंद करत होते. त्यावेळी आरोपी सुमित शेजवळ हा हॉटेलच्या बंद गेटच्या वरून उडी मारून आत आला. त्याने हेगडे आणि मॅनेजर यशपाल तसेच वॉचमन माधव यांच्याशी वाद व हुज्जत घातला. हेगडे यांनी त्याला प्रवेश दिला नाही म्हणुन सुमित शेजवळला राग आला. हेगडे हे त्यांच्या ओळखीचे रोहन शहा यांच्याशी हॉटेलसमो गप्पा मारत असताना सुमित शेजवळने पाठीमागुन येवुन अचानकपणे तुला आज जिवंत ठेवत नाही असे म्हणुन खुनी हल्ला चढविला. त्याने हेगडे यांच्या डोक्यावर, उजव्या कानाजवळ व पाठीवर धारदार हत्याराने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

 

इतर आरोपींनी देखील हेगडे यांच्यावर हल्ला चढविला. दरम्यान, आरोपीपैकी एकाने हॉटेलमधील वेटर आसीक मंडल याच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात हेगडे आणि हॉटेलमधील वेटर गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड रोड पोलिस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक चंदनशिव करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | Pune-Singhgad Road Crime News: Two of Greenfield Restobar were attacked by criminals, pune police arrest three

 

हे देखील वाचा :

MNS Chief Raj Thackeray | हे प्रशासनाला कळलं नाही का?, श्री सदस्यांना श्रद्धांजली वाहत राज ठाकरेंनी सरकारला सुनावले

Maharashtra Bhushan Award | महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानंतर 11 जणांचा उष्माघाताने मृत्यू, विरोधकांकडून सरकारवर टीकास्त्र

Pune Crime News | पुणे-दत्तवाडी क्राईम न्यूज : पर्स शोरुममध्ये आणल्याने महिलेचा केला विनयभंग; सिंहगड रोडवरील व्हॅन ह्युसेन शोरुममधील घटना

 

Related Posts