IMPIMP

Maharashtra Bhushan Award | महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानंतर 11 जणांचा उष्माघाताने मृत्यू, विरोधकांकडून सरकारवर टीकास्त्र

by nagesh
Maharashtra Bhushan Award | ajit pawar slams cm eknath shinde devendra fadnavis on maharashtra bhushan heatstroke death

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाईन- रविवारी ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Padmashri Dr. Appasaheb
Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने (Maharashtra Bhushan Award) गौरवण्यात आलं. या सोहळ्यासाठी राज्यभरातून
आप्पासाहेबांचे अनुयायी आले होते. परंतु, या कार्यक्रमानंतर उष्माघातानं (Heat Stroke) तब्बल 11 जणांचा मृत्यू (Death) झाल्यामुळे खळबळ
उडाली आहे. या घनटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटताना दिसत आहे. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमावरुन (Maharashtra
Bhushan Award) विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ढिसाळ कारभारामुळे कार्यक्रमाला गालबोट लागलं – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, डॉक्टरांनी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. कार्यक्रमाच्या चुकीची वेळ कोणी दिली? ढिसाळ कारभारामुळे महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan Award) कार्यक्रमाला गालबोट लागलं. सरकार (State Government) या घटनेची चौकशी करेल की नाही माहिती नाही. पण, अमित शहांना (Amit Shah) दौऱ्यासाठी जायचं असल्याने हा कार्यक्रम भर दुपारी घेतला असेल, तर याची चौकशी कोण करणार? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी केले. तसेच या घटनेत निरपराध जीव गेले आहेत. अमित शहांना वेळ नसल्याने जर हा कार्यक्रम दुपारी ठेवला असेल, तर विचित्र प्रकार आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.

 

 

मृताचा योग्य आकडा समोर यायला हवा – अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, महाराष्ट्र भूषण पुरस्कार फार महत्त्वाचा आहे. मात्र, हलगर्जीपणा झाल्यामुळे काय घडू शकते हे आजच्या घटनेतून पाहायला मिळालं. महत्त्वाच्या कार्यक्रमाला गालबोट लागलं, एक काळा डाग त्यावर बसला आहे. अजूनही नेमके किती लोक मृत्यूमुखी पडले हा आकडा समोर येत नाहीये. उद्धव ठाकरेंच्या काळात मुख्यमंत्री आम्हाला सांगायचे की कोरोनाचा कोणताही आकडा लपवायचा नाही. जे घडेल, ती वस्तुस्थिती लोकांना सांगायची. आत्ता एमजीएम पनवेल (MGM Panvel), एमजीएम वाशी (MGM Vashi), डी. वाय. पाटील (D. Y. Patil), टाटा रुग्णालयात (Tata Hospital) रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सरकारमध्ये माणुसकी राहिलेली नाही – नाना पटोले

या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात लोक येणार होती, हे सरकारला माहिती होत, तरीही या सरकारने लोकांसाठी सावलीची व्यवस्था केली नाही. एवढी मानवताही या सरकारमध्ये राहिलेली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी दिली. ते पुढे म्हणाले, राज्यातील शिंदे सरकारमध्ये आता माणुसकी राहिलेली नाही. या प्रकरणी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (FIR) दाखल व्हायला पाहिजे. या घटनेने महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. याची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, सरकारने चूक मान्य केली पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले.

 

https://www.facebook.com/RajThackeray

 

हे टाळता आलं नसतं का? – राज ठाकरे
मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) म्हणाले, काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का ? कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का? सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी. ह्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

राजकीय शक्ती प्रदर्शनाची हौस टाळली असती तर – रोहित पवार

खारघरमध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला भर उन्हात बसलेल्या नागरिकांपैकी ८ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि अत्यवस्थ असलेले नागरीक लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना. पण या निमित्ताने एक प्रश्न पडतो की ऐन उन्हाळ्यात भर दुपारी एवढा मोठा कार्यक्रम घेण्याची गरज होती का? हे टाळता आलं नसतं का? राजकीय शक्ती प्रदर्शनाची हौस टाळली असती तर एका चांगल्या कार्यक्रमाला आज गालबोट लागलं नसतं आणि निष्पाप बळी गेले नसते. हा पूर्णतः सरकारचा बेजबाबदारपणा आहे, अशा शब्दात आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी सरकारला धारेवर धरलं आहे.

 

 

सरकारविरोधात गुन्हा दाखल करा – अमोल मिटकरी

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी ट्वीट करुन 11 जणांच्या मृत्यूला राज्य सरकारला जबाबदार धरलं आहे. ते म्हणाले, आजवर महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची सुद्धा एक पद्धत होती. मात्र या सरकारने अध्यात्माचे राजकारण करत नाहक लोकांचा बळी घेतला आहे. त्यांच्या मृत्यूला शिंदे सरकार जबाबदार आहे. तसेच त्यांनी शिंदे सरकारविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली. 11 जणांच्या मृत्यू प्रकरणी शिंदे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही मागणी आता सद्गगुरू परिवारानेही जोर लावून धरली पाहिजे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Bhushan Award | ajit pawar slams cm eknath shinde devendra fadnavis on maharashtra bhushan heatstroke death

 

हे देखील वाचा :

Pune MahaVitaran News | पुणे न्यूज : ‘सौर ऊर्जे’तील कामगिरीबद्दल महावितरणला पुरस्कार ! मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अभियंता संतोष पटनी यांनाही पुरस्कार

Pune Jt CP Sandeep Karnik | पुणे-आझम कॅम्पस : ‘रोझा इफ्तार व्हावे बंधूभावाचे व्यासपीठ’ – पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक

Pune Crime News | पुणे-दत्तवाडी क्राईम न्यूज : पर्स शोरुममध्ये आणल्याने महिलेचा केला विनयभंग; सिंहगड रोडवरील व्हॅन ह्युसेन शोरुममधील घटना

 

Related Posts