IMPIMP

Pune Crime News | सरंक्षण खात्यातील ग्राहकांच्या नावे ४६ कार्सची केली परस्पर विक्री; खडकीच्या सी एस डी डेपोच्या नावाने बनावट धनादेश देऊन केली कोट्यवधींची फसवणूक

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Warje Police Station - 86 Lakh fraudster arrested by offering attractive returns

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | भारतीय संरक्षण खात्यात ग्राहक काम करीत असल्याचे सांगून कंपनीतून तब्बल ४६ कार बाहेर काढल्या. त्या परस्पर दुसर्‍याला विकून त्याची रक्कम कंपनीत जमा न करता कोट्यावधीची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे आरोपीने खडकी येथील सी एस डी डेपोचे क्षेत्रीय प्रबंधक यांच्या नावाने बनावट धनादेश तयार करुन फसवणूक (Fraud Case) केली आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी मोहन त्रिंबके यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police) फिर्याद (गु. रजि. नं. १७६/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी साई प्रविण नंजुन दप्पा Sai Pravin Nanjun Dappa (रा. धायरी) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार कात्रज बायपास रोडवरील (Katraj Bypass Road) ईशान्य ह्युंदाई मोटर्स येथे १३ मे २०२१ ते १७ डिसेबर २०२२ दरम्यान घडली आहे. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साई याला कंपनीने कारविक्रीबाबत काही अधिकार दिले होते.
त्या अधिकाराचा गैरवापर करुन त्याने या काळात एकूण ४६ ग्राहक हे भारतीय संरक्षण खात्यात काम
करीत असल्याचे खोटे भासविले. त्यानंतर या ग्राहकांचे वाहन सोडण्याचे गेट पास बनवून त्यावर स्वत:ची सही
करुन कंपनीतील ४६ चारचाकी गाड्या बाहेर काढल्या.
त्या गाड्या खासगी व्यक्तींना परस्पर विक्री करुन ती रक्कम कंपनीत जमा न करता स्वत: स्वीकारुन कंपनीची
फसवणूक केली. त्यानंतर त्याने खडकी येथील सी एस डी डेपोचे क्षेत्रीय प्रबंधक यांच्या नावाने दोन बनावट चेक
तयार करुन ते खरे आहेत, असे भासवून ते कंपनीत जमा केले. त्यानंतर तो फसवणूक करुन पळून गेला.
पोलीस उपनिरीक्षक घोगरे तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | Reciprocal sale of 46 cars on behalf of customers in the savings account; Fraud of crores by issuing fake checks in the name of Khadki’s CSD Depot

 

हे देखील वाचा :

Mumbai- Pune Expressway Accident | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, कारची ट्रकला मागून धडक; तिघांचा जागीच मृत्यू

Pune Crime News | फायनान्स कंपनीच्या अधिकृत टोल फ्री क्रमांकावर तरुणाची फसवणूक; नवीन क्रेडीट कार्ड पिन जनरेट करण्यास सांगून लुबाडले साडेसात लाख

 

Related Posts