IMPIMP

Pune Minor Girl Rape Case | प्रेमसंबंधाच्या ‘लफड्या’ बाबत नातेवाईकांना सांगण्याची धमकी ! 15 वर्षीय मुलीशी केली वेळावेळी ‘लगट’, गर्भवती राहिल्यानं ‘पर्दाफाश’

by Team Deccan Express
Pune Crime News | Sexual assault on a woman by luring her into marriage, an incident in Kondhwa area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Minor Girl Rape Case | नात्यातील २० वर्षाच्या मुलाने १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीबरोबर आपले प्रेमसंबंध (Love Affair) असल्याचे सर्व नातेवाईकांना सांगेन, अशी धमकी (Pune Crime) देऊन तिच्याशी वारंवार शारीरीक संबंध (Physical Relation) ठेवले. त्यातून ही मुलगी गर्भवती (Pregnant) राहिल्याने हा प्रकार समोर आला आहे. (Pune Minor Girl Rape Case)

 

चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police) विशाल पिराजी शिकरे Vishal Piraji Shikare (वय २०, रा. खराडी – Kharadi) याला अटक (Arrest In Rape Case) केली आहे. हा प्रकार मार्च २०२२ पासून २७ मेपर्यंत सुरु होता. (Pune Crime)

 

याबाबत या मुलीच्या आईने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १८४/२२) दिली आहे. (Crime Aganist Woman)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीच्या नात्यातील आहे. त्यामुळे त्यांचे एकमेकांच्या घरी जाणे येणे होते. त्यातूनच फिर्यादी यांची १५ वर्षाची मुलगी व आरोपी यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मार्च २०२२ मध्ये घरात कोणी नसताना विशाल घरी आला. त्याने फिर्यादी यांच्या मुलीला आपले प्रेमसंबंध असल्याचे सर्व नातेवाईकामध्ये सांगेन, अशी धमकी देऊन तिच्याबरोबर शारिरीक संबंध निर्माण केले. या घटनेनंतर त्याने तिच्याशी वारंवार शारिरीक संबंध ठेवले. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. याची माहिती फिर्यादी यांना समजल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक मुळुक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | Pune Minor Girl Rape Case Registered In
Chandan Nagar Police Station Kharadi Vishal Piraji Shikare

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Related Posts