IMPIMP

Unmesh Patil BJP – Shivsena UBT | जळगाव: भाजपचे खासदार उन्मेष पाटील ‘उबाठा’मध्ये जाणार

by sachinsitapure

जळगाव: Unmesh Patil BJP – Shivsena UBT | जळगाव लोकसभा मतदारसंघाचे (Jalgaon Lok Sabha 2024) भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेष पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांना भाजपने डावलत स्मिता वाघ (Smita Wagh) यांना उमेदवारी दिली आहे. तिकीट नाकारल्यापासून पाटील पक्षावर नाराज होते.

महाविकास आघाडीच्या (MahaVikash Aghadi) जागावाटपात ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. त्यामुळे पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षात जाण्याच्या दृष्टीने गाठीभेटी घेतल्या. आज सकाळीच त्यांनी आधी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि नंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. यामुळे भाजपला उत्तर महाराष्ट्रात एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

अशातच उन्मेश पाटील यांचा आमच्या पक्षातील प्रवेश निश्चित झाला असून उद्या पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला आहे.

Pune Raviwar Peth Crime | अर्ध्या तासात कामगाराने चोरले साडे 9 लाखांचे सोने, रविवार पेठेतील घटना

Related Posts