IMPIMP

Sameer Wankhede | मुंबई ड्रग्ज प्रकरणानं NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ?

by nagesh
Sameer Wankhede | mumbai ncb divisional sameer wankhede transferred to central customs and excise department

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Sameer Wankhede | मुंबईच्या समुद्रात क्रूझवर ड्रग्ज प्रकरणी बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Mumbai Cruise Drugs Case) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला जामीन मिळाला. मात्र दुसरीकडे मुंबई एनसीबी (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सर्वत्र आरोप होत असताना समीर वानखेडे यांनी कोर्टात धाव घेतली. त्यानंतर कोर्टाने त्यांना दिलासा दिला. पंरतु हे प्रकरण मिटण्याची काही चिन्हे दिसेना झालीत. हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होऊन याच्याशी संबधित विविध व्यक्तींच्या भूमिका मागील 25 दिवसांत कशा बदलल्या. ते पाहा.

आर्यन खान प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) चौकशीची वेळ तपास अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. या प्रकरणात काही उलडले झाले की
वानखेडे यांच्यावर धर्म- जात तसंच वसुलीचे आरोप झाले. वसुलीच्या आरोपांनी घेरलेल्या वानखेडे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. समीर वानखेडे
यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यापूर्वी मुंबई पोलिसांनी किमान तीन दिवस आधी माहिती द्यावी, असे कोर्टाकडून सांगितलं आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर नवाब मलिक हे दररोज नवीन आरोप करत आहेत. त्यांनी आता समीर यांच्या दाढीवाल्या मित्रासोबतच्या मैत्रीवर सवाल उपस्थित केला. या दाढीवाल्याचा संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटशी जोडताना समीर वानखेडे स्वतः ड्रग्ज सिंडिकेटमध्ये सामील असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्या दाढीवाल्या व्यक्तीचं नाव काशिफ खान आहे आणि तो फॅशन टीव्हीचा इंडिया हेड आहे. क्रूझवरील पार्टीचं आयोजनही फॅशन टीव्हीनं केलं होतं आणि छापेमारीच्या वेळी काशिफ खान क्रूझवर उपस्थित होता. याआधारे नवाब मलिक समीर वानखेडेंचे छापे आणि हेतू यावर सवाल उपस्थित करत आहेत. काशिफसोबत असलेल्या मैत्रीखातर समीर यांनी त्याला सोडून दिलं. जो या पार्टीचा आयोजक होता. असा आरोप मलिकांनी केला.

समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचे वडिल डॉ. जाहिद कुरेशी (Dr. Zahid Qureshi) यांनी केलेल्या दाव्यामुळे समीर आणि त्यांचे कुटुंब मुस्लिम असल्याचा दावा अधिक बळकट झाला आहे. समीर वानखेडे यांचे पहिले सासरे डॉ.जाहिद कुरेशी म्हणाले, समीर वानखेडे यांचे कुटुंब मुस्लिम आहे. कुटुंब मुस्लिम आहे हे मला आत्तापर्यंत माहित होते. मुस्लिम कुटुंब होतं म्हणून माझ्या मुलीचं लग्न झालं. तो हिंदू आहे हे मला माहित नव्हतं.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी केपी गोसावीला साक्षीदार बनवण्यात आले होते. केपी गोसावीचा आर्यन खानला पकडून घेऊन जाताना आणि आर्यन खानसोबतच सेल्फी व्हायरल झाला होता. मात्र त्यानंतर किरण गोसावी फरार झाला होता. काल त्याला पुण्यात अटक केलीय. त्याला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मात्र, ज्या प्रकरणात गोसावी यांना अटक करण्यात आली आहे, ते प्रकरण फसवणुकीचे आहे. दरम्यान, प्रभाकर साहिल यांनी केलेल्या आरोपानंतर एकच गोंधळ उडाला. जो आर्यनच्या अटकेच्या वेळी सक्रिय होता. प्रभाकरने न्यायालयात प्रतिज्ञापत्र देऊन समीर वानखेडे यांच्यावर वसुलीचा आरोप केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

धर्म-जात खोटं सांगून नोकरी घेतल्याचा आरोप समीर वानखेडे हा हिंदू आहे की मुस्लिम या प्रश्नावर वेगवेगळे दावे केले जात आहेत.
मात्र त्यांनी एससी कोट्यातून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे धर्मासोबतच त्यांच्या जातीवरही प्रश्न निर्माण झालेत.
कारण समीर मुस्लिम असतील तर त्यांना आरक्षणाचा लाभ मिळू शकत नाही.
सध्या धर्म आणि जात या प्रकरणी चौकशी सुरू झाली नाही आहे.

 

Web Title: Sameer Wankhede | aryan khan drugs case mumbai cruise allegations against ncb officer sameer wankhede

 

हे देखील वाचा :

Pune Crime | इंदापूर पंचायत समितीत माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Sabyasachi Mukherjee | मंगळसूत्राची जाहिरात आहे की कामसूत्रची?, फॅशन डिझायनर सब्यसाचीच्या ‘ज्वेलरी’वर युझर्सची टीका

PMC Employees News | बोनस व सानुग्रह अनुदान जमा झाल्याने पालिका कर्मचाऱ्यांची ‘दिवाळी’ सुरू

 

Related Posts