IMPIMP

तब्बल 7 वर्षांनंतर सिनेमात कमबॅक करणार जया बच्चन ! ‘या’ मराठी दिग्दर्शकासोबत करणार काम

by sikandershaikh
jaya-bachchan

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – सिनेमात अभिनयाची जादू दाखवल्यानंतर राजकारणात सक्रिय झालेल्या जया बच्चन पुन्हा एकदा सिनेमात कमबॅक करणार आहेत. जया बच्चन (jaya bachchan) तब्बल 7 वर्षांनंतर सिनेमात परत येणार आहेत. अशीही चर्चा आहे की, जया मराठी सिनेमातून कमबॅक आणि त्यांचा मराठी डेब्यू करणार आहेत.

एका रिपोर्टनुसार, जया बच्चन डायरेक्टर गजेंद्र अहिरे यांच्या मराठी सिनेमातून मराठीत डेब्यू आणि सिनेमात वापसी करणार आहेत. गजेंद्र अहिरे यांनी जवळपास 50 मराठी सिनेमे तयार केले आहेत.

शेवटच्या या सिनेमात दिसल्या होत्या जया बच्चन

जया बच्चन (jaya bachchan) शेवटच्या 2013 साली आलेल्या बाइलिंगुअल सिनेमा सनग्लास मध्ये दिसल्या होत्या. या सिनेमात त्या नसीरुद्धीन शाह सोबत दिसल्या होत्या. आता 7 वर्षांनंतर त्या सिनेमात काम करणार आहेत. 2016 साली आलेल्या की अँड का या सिनेमातही त्या अमिताभ बच्चन सोबत स्पेशल अपीरंस देताना दिसल्या होत्या.

जया यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर गुड्डी, अभिमान, मिली अशा सिनेमात त्यांचा निष्पाप अवतार पहायला मिळाला आहे. तर शोले, सिलसिला, चुपके चुपके, कोशिश, कभी खुशी कभी गम अशा सिनेमात त्यांचा निराळाच अंदाज दिसला आहे. आता लवकरच त्या मराठी सिनेमातून कमबॅक करत आहेत.

Related Posts