IMPIMP

Photos : खास फोटो शेअर करत अभिनेत्री सायली संजीवनं दिल्या ‘महिला दिना’च्या शुभेच्छा

by bali123
happy international womens day sayali sanjeev wish all womens

सरकारसत्ता ऑनलाइन – लहान पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव (sayali sanjeev) सोशल मीडियावर कायमच अॅक्टीव्ह असते. आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं ती कायमच चाहत्यांचं अटेंशन घेत असते. आज सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. अशात सायलीनं महिला दिनाच्या खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या फोटोंमुळं ती पु्न्हा एकदा चर्चेत आली आहे.

सायलीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं ब्लॅक ड्रेस घातला आहे. सोबत तिनं खास पोस्ट शेअर करत महिला दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. तिनं ब्लॅक गॉगलही घातला आहे. ज्यात ती खूपच डॅशिंग आणि सुंदर दिसत आहे. तिचा हा स्वॅग आणि स्टाईल साऱ्यांनाच आवडला आहे.

https://www.instagram.com/p/CMJHlxIlQ2A/

सायलीचे (sayali sanjeev) हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या लुकचं कौतुक केलं आहे.

https://www.instagram.com/p/CMBdAhYlx9e/

सायलीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काहे दिया परदेस या मराठी मालिकेतून तिनं साऱ्याचं मन जिंकलं होतं.
तिची ही मालिका खूप गाजली होती.
मालिकेती तिनं गौरी ही प्रमुख भूमिका साकारली होती.
अभिनेता ऋषी सक्सेना तिच्यासोबत प्रमुख भूमिकेत होता.
त्यानं शिव नावाची भूमिका साकारली होती.

Related Posts