IMPIMP

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

by pranjalishirish
kangana ranaut tweet on param bir singh transfer this is the beginning of shivsena end

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – सचिन वझे प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यामुळे गेले काही दिवस शांत असलेली अभिनेत्री कंगना राणौत Kangana Ranaut  पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या बदलीवर तिने ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात तिने म्हटले आहे की, ही तीच व्यक्ती आहे, तिने मुंबईच्या रस्त्यांवर माझ्याबाबत अपमानकारक पोस्टरला प्रोत्साहित केले. जेव्हा मी बदला घेतला. तेव्हा सोनिया सेनेद्वारा त्याचा बचाव केला गेला. आणि त्यांनी बदला घेण्यासाठी माझे घर तोडले. आज पहा शिवसेनेने त्यांना बाहेर काढले आहे. ही शिवसेनेच्या अंताची सुरुवात आहे.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांवर अपमानकारक टिका केल्याने कंगना राणौत Kangana Ranaut विरुद्ध मुंबईत शिवसेना रस्त्यावर उतरली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेने बेकायदा बांधकाम केल्याची नोटीस पाठवित तिच्या फ्लॅटवर अतिक्रमण विभागाद्वारे कारवाई केली होती. हा वाद खूप गाजला होता. तिच्याविरुद्ध तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये उच्च न्यायालयाने तिला पोलिसांपुढे हजर राहण्यास सांगितल्यानंतर गेले काही दिवस ती शांत होती.

Also Read : 

WB Elections : ममतादीदींकडून आश्वासनांची बरसात

PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी ! EPFO ने WhatsApp वर सुरू केलीय ‘ही’ खास सेवा, जाणून घ्या

WB Elections : ममतादीदींकडून आश्वासनांची बरसात

सोलापूर काँग्रेसला नवी उभारी मिळणार ! गणेश माने देशमुख काँग्रेसमध्ये

अबब ! तब्बल 5 किलो सोन्याचे दागिने घालून उमेदवार पोहोचला अर्ज भरण्यासाठी

धक्कादायक ! कुस्तीच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्याने बबिता फोगटच्या बहिणीची आत्महत्या

Related Posts