IMPIMP

मृण्मयी देशपांडेच्या ‘नो मेकअप’ लुकची सोशलवर जोरदार ‘चर्चा’ !

by bali123
mrunmayee deshpande shares no makeup look picture social media

सरकारसत्ता ऑनलाइन –  मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrinmayee Deshpande) सोशलवर खूप अॅक्टीव्ह असते आणि खूप लोकप्रिय देखील आहे. मृण्मयी कायमच आपले फोटो शेअर सोशल मीडियावरून करत असते ज्यामुळं ती चर्चेत येत असते. पुन्हा एकदा असंच काहीसं झालं आहे. परंतु तिनं जो फोटो शेअर केला आहे त्यात ती नोमेकअप लुकमध्ये दिसत आहे.

मृण्मयीनं Mrinmayee Deshpande तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात ती नो मेकअप लुकमध्ये दिसत आहे. तिचा हा फोटो पाहिल्यानंतर चाहतेही हैराण झाले. कारण यातही खूप सुंदर दिसत आहे.

मृ्ण्मयीचा Mrinmayee Deshpande हा फोटो सध्या सोशलवर व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहत्यांना तिचा हा लुक आवडल्यानं त्यांनी तिचं कौतुक केलं आहे. तू मेकअपशिवाय देखील खूप छान दिसते असं अनेक चाहत्यांनी म्हटलं आहे.

मृ्ण्मयीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कट्यार काळजात घुसली, नटसम्राट, स्लॅमबुक, मन फकिरा अशा अनेक सिनेमात तिनं काम केलं आहे. फर्जंद सिनेमात तिनं साकारलेली भूमिका लक्षवेधी ठरली होती. अग्निहोत्र, कुंकू अशा काही मालिकेतून ती घराघरात पोहोचली आहे. नाटक, सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही माध्यमात तिनं काम केलं आहे.

Related Posts