IMPIMP

Sachin Tendulkar | जुगाराच्या प्रमोशनसाठी क्रिकेटच्या देवाचा वापर; संतापलेल्या सचिनने उचलंलं ‘हे’ मोठं पाऊल!

by nagesh
Sachin Tendulkar | sachin tendulkar tweet goes viral saying requesting everyone to remain vigilant about misleading images on social media

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sachin Tendulkar) क्रिकेटचा देव म्हणून गणला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या फोटोच्या वापर जुगारासाठी होत आहे. याबाबत स्वत: सचिनने (Sachin Tendulkar) माहिती दिली असून आता या कंपन्यांवर तो कायदेशीर कारवाई करणार आहे. सचिनने यासंदर्भात ट्विट केलं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सोशल मीडियावर माझ्या बनावट फोटोचा वापर करून मी कॅसिनोचे प्रमोशन केल्याचा फोटो पाहण्यात आले आहेत. मात्र मी कधीच सिगारेट, जुगार आणि तंबाखूजन्य पदार्थांचे प्रमोशन केले नाही. त्यामुळे माझ्या फोटोचा वापर करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचं सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) म्हटलं आहे.

 

 

या गोष्टीमुळे सचिन संतापला आहे. त्यामुळे, मी माझ्या लीगल टीमला (Legal Team) संबंधित कंपन्यांवर कारवाई करायला सांगितली असल्याचं सचिन म्हणाला. मला ही गोष्ट सर्वांना सांगणं गरजेचं वाटलं आणि खोट्या जाहिराती (False ads) करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं सचिनने सांगितलं. सचिनने आपण अशा गोष्टींची जाहिरात का करत नाही याबाबत एकदा सांगितलं होतं.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, मला माझ्या वडिलांनी तंबाखूजन्य, गुटखा अशा जाहिरातीपासून लांब राहण्याचा सल्ला दिला होता.
त्यासोबतच मी अनेकांसाठी रोल मॉडेल असल्याचं ते म्हणाले होते.
1990 मध्ये माझ्या बॅटवर कोणतेही स्टीकर नव्हतं त्यावेळी माझा कोणत्याही कंपन्यांशी करार (Agreement) झाला नव्हता.
त्यावेळी मला अशा कंपन्यांच्या (Company) अनेक ऑफर (Offer) आल्या होत्या. मात्र मी माझ्या वडिलांचा शब्द पाळल्याची आठवण सचिनने सांगितली होती.

 

Web Title :- Sachin Tendulkar | sachin tendulkar tweet goes viral saying requesting everyone to remain vigilant about misleading images on social media

 

हे देखील वाचा :

ED Investigating High Profile Cases | ED हाताळत असलेली ‘ही’ आहेत आजवरची 5 हाय प्रोफाईल प्रकरणं; जाणून घ्या

Buttermilk-Chia Seeds | ताकासोबत ‘या’ बिया मिसळून प्या, आरोग्याला होतात ‘हे’ 5 आश्चर्यकारक फायदे

High Court | केरळ हायकोर्टाचा महत्वाचा निकाल ! आक्षेपार्ह पोस्टला WhatsApp Admin नसणार जबाबदार

Herbs for Cholesterol | रक्तवाहिन्यांमध्ये अडकलेले खराब कोलेस्ट्रॉल 2 दिवसात बाहेर काढतील ‘या’ 8 आयुर्वेदिक वनस्पती

 

Related Posts