Sanjay Shirsat On Congress | संजय शिरसाट यांचे खळबळजनक वक्तव्य, काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा भाजपा, शिंदे गटाला छुपा पाठिंबा, लवकरच…
मुंबई : Sanjay Shirsat On Congress | काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा भाजपा आणि शिवसेनेला छुपा पाठिंबा आहे. पक्षाचे नाव असल्यामुळे ते तसे दाखवत नाहीत. काँग्रेसमध्ये एकवाक्यता नसल्याने त्यांचा पाठिंबा कायम असतो. आम्ही नेहमी सांगत होतो की, काँग्रेसचे बडे नेते आमच्या संपर्कात आहेत. आताही काहीजण छुपा पाठिंबा देत असून लवकरच त्यांचा पक्ष प्रवेश होईल, असे खळबळजनक वक्तव्य शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे (Eknath Sinde) नेते संजय शिरसाट यांनी केले आहे.
संजय शिरसाट म्हणाले, नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर प्रदीर्घ बैठक घेतली. सर्व जागा निवडून आणण्यासंदर्भात चर्चा झाली. आता बैठका कमी होत असून शिवसेनेच्या जागा शिवसेनेकडेच राहणार आहेत.
संजय शिरसाट म्हणाले, पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची रणनीती आखली गेली आहे. महायुतीचे मेळावे घेण्याचे आदेश दिले आहेत. महायुतीमध्ये तिढा नाही. १६ ते १८ जागा लढण्याची तयारी आमची होती, १६ पेक्षा कमी जागा मिळणार नाहीत. नाशिकची जागा शिवसेनेला मिळणार असून उमेदवार कमजोर असेल तर जागा बदलता येईल, असा दावा शिरसाट यांनी केला.
Pune Bhimpura Camp Crime | पुणे : पाण्यावरुन वाद, घरात घुसुन मारहाण करुन पाडले दात
Comments are closed.