IMPIMP

Overdraft Facility | खात्यात Zero Balance, तरीसुद्धा काढू शकता Salary च्या तीनपट पैसे! जाणून घ्या काय आहे बँकांची ‘ही’ विशेष सुविधा

by nagesh
overdraft facility allows customers to withdraw money from bank account even when balance is zero

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– Overdraft Facility | जर तुम्ही सॅलरीड कर्मचारी आहात आणि तुमची सॅलरी दरमहिना बँक खात्यात क्रेडीट होत असेल तर तुम्ही सॅलरी ओव्हरड्राफ्टचा (Overdraft Facility) फायदा घेऊ शकता. सॅलरी ओव्हरड्राफ्ट एकप्रकारचे रिव्हॉल्विंग क्रेडिट असते, जे सॅलरी अकाऊंटवर मिळते. जेव्हा तुम्हाला सॅलरीशिवाय जास्त पैशांची आश्यकता असते, तेव्हा तुम्ही या खात्यातून जादा रक्कम काढू शकता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

कुणाला मिळतो ओव्हरड्राफ्ट

सर्व बँक ग्राहकांना ही सुविधा मिळत नाही. बँक आपल्या काही ग्राहकांना आणि त्यांच्या कंपनीचे क्रेडिट प्रोफाइल पाहिल्यानंतरच ओव्हरड्राफ्ट सुविधा देते. ICICI Bank, SBI सारख्या बँका ही सुविधा देतात. बँकेच्या कस्टमर केयरवर याबाबत माहिती घेऊ शकता. बँकेचे ओव्हरड्राफ्टचे लिमिट अगोदरच ठरलेले असते.

 

सॅलरी ओव्हरड्राफ्टचे लिमिट

काही बँका मंथली सॅलरीच्या 2-3 पटपर्यंत ओव्हरड्रॉफ्टची सुविधा देतात. तर काही बँका मंथली सॅलरीच्या 80-90 टक्के पर्यंत ही सुविधा देतात. काही बँकांसाठी ओव्हरड्राफ्ट कॅपच्या नियमावर काम करतात. याचे कमाल लिमिट 4-5 लाख रुपयांपर्यंत असू शकते. काही बँकांसाठी हे कॅप 1-1.5 लाख रुपयापर्यंत असते.

 

हे एक प्रकारचे Instant Loan

ओव्हरड्राफ्ट एक प्रकारचे Instant Loan आहे. यासाठी तुम्हाला व्याज सुद्धा द्यावे लागते. प्रोसेसिंग फी सुद्धा द्यावी लागते. ऑनलाइन ही सुविधा अ‍ॅक्टिव्हेट करता येते. ताबडतोब मंजूरी मिळते. 48 तासाच्या आत ओव्हरड्राफ्ट मर्यादेचा वापर करू शकतात.

हे व्याज मंजूर रक्कमेवर चार्ज केले जात नाही. त्याऐवजी खात्यातून काढलेल्या रक्कमेवरच व्याज लागेल. दर महिना एक ते तीन टक्का व्याज लागू शकते. म्हणजे वार्षिक 12 ते 30 टक्के व्याज लागते. वेळेवर व्याज न भरल्यास पेनल्टी लागू शकते.

 

Web Title : overdraft facility allows customers to withdraw money from bank account even when balance is zero

 

हे देखील वाचा :

Pune Crime | 30 कोटीच्या खंडणी, फसवणूक प्रकरणी अली अकबर जाफरी व वनेसा डिसुजा यांच्यावर खंडणीचा गुन्हा

Chandrakant Patil | भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील अपघातातून थोडक्यात बचावले

Pune Crime | सीटी स्कॅन मशीन देण्याच्या आमिषाने डॉक्टरांना 18 लाखांना गंडा

Delta Variant | लसीकरणाने तयार होणार्‍या अँटीबाडी समोर निष्प्रभ होतो कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट, शास्त्रज्ञांचा दावा

Pune Crime | सायबर चोरट्यांनी Lombard जनरल इन्शुरन्स कंपनीला केले ‘टार्गेट’; कंपनीतून बोलत असल्याचे सांगून देशभरात अनेकांची केली फसवणूक

Taliban | तालिबानचा मोठा निर्णय, भारताला धक्का देत आयात-निर्यातीवर घातली बंदी

 

Related Posts