IMPIMP

Taliban | तालिबानचा मोठा निर्णय, भारताला धक्का देत आयात-निर्यातीवर घातली बंदी

by nagesh
Taliban big decision after taking over afghanistan india import export ban pakistan route

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– तालिबाननं (Taliban) अफगाणिस्तानावर (Afghanistan) कब्जा केल्यानंतर आता त्यांच्या शेजारी किंवा इतर कोणत्याही दुसऱ्या देशांसोबत संबंध बदलू लागले आहेत. भारत (India) आणि अफगाणिस्तान हे खूप जवळचे चांगले मित्र आहेत. मात्र तालिबान (Taliban) सत्तेवर येताच त्यांनी भारतासोबत आयात (Import) आणि निर्यात (Export) या दोन्हीवर बंदी घातली आहे. तालिबाननं भारतासोबत सर्व प्रकारची आयात आणि निर्यात बंद केली आहे.

 

फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट (Federation of Indian Exports) ऑर्गनायझेशनचे महासंचालक डॉ. अजय सहाई (Director General Dr. Ajay Sahai) यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, तालिबानने पाकिस्तानच्या (Pakistan) हवाई मार्गाने होणारी, कार्गो वाहतूक आता थांबवली आहे. देशामधून होणारी आयातही रोखण्यात आली आहे. अफगाणिस्तान मधील अस्थिरतेमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची दाट शक्यता असल्याने भारतात सुकामेवा महागण्याचे संकेत आहेत. आम्ही अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. जेणेकरुन आम्ही पुरवठा सुरु करु शकू.

 

भारताची अफगाणिस्तानमध्ये मोठी गुंतवणूक

डॉ. अजय सहाई यांच्या म्हणण्यानुसार, व्यवसायाच्या बाबतीत भारत हा अफगाणिस्तानचा सर्वात मोठा भागीदार आहे. 2021 मध्येच आपल्या देशातील निर्यात 835 मिलियन डॉलर होती. तर 510 मिलियन डॉलरची आयत होती. आयात-निर्यातीव्यतिरिक्त भारताने अफागाणिस्तानात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. ज्यामध्ये सुमारे 400 योजनांमध्ये 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे. भारत साखर, चहा, कॉफी मसाला सहित इतर वस्तूंची निर्यात करतो. तर ड्राय फ्रूट्स (Dry fruits), कांदे इत्यादी मोठ्या प्रमाणावर आयात केले जातात. तालिबानने आयात-निर्यातवर बंदी घातल्याने भारतात येत्या काळात सुक्या मेव्याचे भाव वाढू शकतात.

 

Web Title : Taliban big decision after taking over afghanistan india import export ban pakistan route

 

हे देखील वाचा :

Bhosari Plot Scam Case | भोसरी भूखंड घोटाळा प्रकरण; मंदाकिनी खडसे ईडीच्या चौकशीसाठी गैरहजर

UIDAI ने जारी केला विशेष अलर्ट! तुमचे Aadhaar Card बनावट तर नाही ना? ‘ही’ आहे चेक करण्याची पद्धत

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण, अद्यापही सोनं 47 हजारांपेक्षा जास्त, जाणून घ्या आजचे दर

 

Related Posts