IMPIMP

आंदोलनकर्त्या की ‘आंदोलनजीवी’ ? जाणून घ्या चर्चित-वादग्रस्त ‘या’ 10 मुलींबाबत

by sikandershaikh
woman in india politics

नवी दिल्ली : woman in india politics | शेतकरी आंदोलनाने जोर पकडल्यानंतर त्याच्या समर्थनासाठी राजकीय पक्ष, सोशल मीडिया अ‍ॅक्टिविस्ट, कलाकार सुद्धा केंद्र सरकारविरोधात एकवटले. पीएम नरेंद्र मोदी यांनी संसदेत अशा लोकांना ‘आंदोलनजीवी’ ठरवले. आता या आंदोलनाशी संबंधीत टूलकिटप्रकरणी 22 वर्षांची दिशा रवी दिल्ली पोलिसांच्या कस्टडीत आहे आणि निकिता जेकब अटक टाळण्यासाठी कोर्टात पोहचली आहे. अशावेळी आम्ही तुम्हाला त्या 10 तरूण महिला चेहर्‍यांबाबत सांगणार आहोत जे मागील काही काळात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून चर्चेत आले आणि कायद्याचा बडगा त्यांच्यावर उगारण्यात आला.

disha-ravi

disha-ravi

1. दिशा रवी

पर्यावरणाशी संबंधीत मुद्द्यांवर काम करणारी कार्यकर्ती दिशा रवीला दिल्ली पोलिसांनी टूलकिट केसमध्ये अटक केली आहे. 22 वर्षीय दिशा रवी बेंगळुरूची राहणारी आहे. दिशा बेंगळुरूच्या एका खासगी कॉलेजमधून बीबीएची पदवीधारक आहे आणि ती ’फ्रायडेज फॉर फ्यूचर इंडिया’ नावाच्या संस्थेची संस्थापक सदस्य सुद्धा आहे. दिशा गुड वेगन मिल्क नावाच्या एक संस्थेत काम करते. या संस्थेचा मुख्य उद्देश प्लँट बेस्ड फूड (व्हेजिटेरियन) स्वस्त आणि सुलभ बनवण्याचा आहे. या लोकांना जनावरांवर आधारित शेती नष्ट करून जनावरांना सुद्धा जगण्याचा अधिकार द्यायचा आहे. सुरूवातीला फ्रायडेज फॉर फ्यूचर संस्थेच्या भारतातील स्वरूपाची दिशा ही एक भाग होती.

दिल्ली पोलिसांनी दिशा रवीवर शेतकर्‍यांच्या समर्थनासाठी बनवलेले एक वादग्रस्त ’टूलकिट’ सोशल मीडियावर शेयर केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांचा आरोप आहे की, दिशा रवीने भारताविरूद्ध शत्रूत्व पसरवण्यासाठी अन्य लोकांसोबत मिळून खालिस्तान-समर्थक गट ’पोएटिक जस्टिस फाऊंडेशन’च्या सोबत संधान साधल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनुसार, ती टूलकिटचे संपादन करणार्‍यांपैकी एक आहे आणि कागदपत्र बनवणे आणि ते पसरवण्याच्या प्रकरणात प्रमुख आहे. (woman in india politics)

nikita jekab

nikita jekab

2. निकिता जेकब

दिल्ली पोलिसांनी टूलकिट प्रकरणात अ‍ॅक्टिविस्ट निकिता जेकबच्या विरोधात एक विना-जामीन वॉरंट जारी केले आहे. 30 वर्षांच्या निकिताने आयएलएस लॉ कॉलेज, पुणे येथून कायद्याचे शिक्षण घेतले आहे आणि मुंबई हायकोर्टात ती वकीली करते. निकिता सामाजिक न्याय आणि पर्यावरण संरक्षणाच्या प्रकरणांवर आवाज उठवणारी कार्यकर्ती आहे. दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, दिशा रवी, निकिता जेकब आणि शांतनुने टूलकिट बनवले आणि इतरांसोबत शेयर केले. पोलिसांनी गुरुवारी निकिताच्या घरी सर्च वॉरंट केले होते.

shrat jahan

shrat jahan

 

3. इशरत जहां

नागरिकत्व कायद्याविरूद्ध पूर्व दिल्लीत झालेल्या आंदोलन प्रकरणात इशरत जहांला 26 फेब्रुवारी 2020 ला पोलिसांनी अटक केली होती. इशरतला 21 मार्चला कडकडडूमा कोटातून जामीन मिळाला होता, परंतु सुटकेच्या दिवशीच स्पेशल सेलने तिला तिहार जेलमध्येच दिल्ली दंगलीच्या कटप्रकरणी अटक करून तिच्यावर युएपीए लावला. इशरत जहां व्यवसायाने वकील आहे आणि काँग्रेसकडून नगरसेवक सुद्धा होती आणि सध्या दिल्ली दंगलीच्या आरोपात तिहार जेलमध्ये बंद आहे. (woman in india politics)

safoora zargar

safoora zargar

4. सफूरा जरगर

दिल्लीत जामिया मिल्लिया इस्लामिया युनिव्हर्सिटीमध्ये सीएए-एनआरसीविरूद्ध झालेल्या आंदोलनात सफूरा जरगर महत्वाचा चेहरा होती. दिल्ली दंगल प्रकरणात सफूरास झालेली अटक खुप चर्चेत होती, तेव्हा तर ती गरोदर होती. जाफराबाद पोलीस ठाण्यात एफआयआर प्रकरणात 10 एप्रिलला सफूराला चौकशीसाठी बोलावण्यात आले आणि त्याच दिवशी अटक करून यूएपीए लावण्यात आला होता. सफूरा जामिया विद्यापीठाची एमफिलची विद्यार्थीनी आहे आणि ती जामिया कॉर्डिनेशन कमेटीशी संबंधी आहे. दिल्ली आयकोर्टमधून 23 जूनला सफूरा जरगर ला ’मानवतेच्या कारणास्तव’ जामीन मिळाला होता.

gulfisha fatima

gulfisha fatima

5. गुलफिशा फातिमा

सीएए-एनआरसीविरूद्ध दिल्लीत झालेल्या आंदोलनात गुलफिशा फातिमा पुढे होती. तिला दिल्ली पोलिसांनी उत्तर पूर्व दिल्लीमध्ये झालेल्या दंगलप्रकरणी अटक केली होती. 28 वर्षांची गुलफिशा फातिमाने गाजियाबादमधून एमबीए केले आहे. 9 एप्रिलला दिल्ली पोलिसांनी तिला जाफराबाद पोलीस ठाण्यात दाखल एफआयआरच्या आधारावर अटक करून तिहार जेलमध्ये पाठवले होते आणि तिच्यावर यूएपीए लावला होता. मात्र, दिल्लीच्या कडकडडूमा कोर्टाने नोव्हेंबर 2020 मध्ये तिला जामीन दिला आहे.

natasha narwal

natasha narwal

6. नताशा नरवाल

दिल्लीच्या जाफराबाद आणि सीलमपुर परिसरात नागरिकत्व सुधारित कायदा आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजनच्या विरूद्ध झालेल्या आंदोलनातील भूमिकेसाठी नताशा नरवाल ला अटक करण्यात आली होती. उत्तर-पूर्व दिल्ली दंगलीतील आरोपी म्हणून तिच्यावर यूएपीए लावला होता. नताशा नरवाल जेएनयूमध्ये सेंटर फॉर हिस्टोरिकल स्टडीजची पीएचडी करत आहे आणि ती महिलावादी संघटना पिंजरा तोड च्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट अजीत नारायण यांनी तिला जामीन देताना म्हटले होते की, आरोपी केवळ एनआरसी आणि सीएएविरूद्ध आंदोलन करत होती आणि असे करणे हा आरोप सिद्ध करत नाही की ती हिंसेत सहभागी होती.

devangana kalita

devangana kalita

7. देवांगना कलिता

देवांगना कलिता ला दरियागंजमध्ये अँटी-सीएए आंदोलनाशी संबंधीत हिंसेप्रकरणी अटक करण्यात आली होती. देवांगनावर सुद्धा दिल्ली दंगलीच्या आरोपाच्या कारणांमुळे यूएपीए लावण्यात आला होता. देवांगना कलिता जेएनयूमध्ये सेंटर फॉर वीमेन स्टडीजमध्ये एमफिल करत आहे आणि महिलावादी संघटना पिंजरा तोड च्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. दिल्ली हायकोर्टचे जज अभिनव पांडे यांनी देवांगनाला जामीन देताना म्हटले होते की, असा कोणताही थेट पुरावा नाही ज्यामध्ये आरोपी एखाद्या सरकारी कर्मचार्‍यांवर हल्ला करताना दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेज सुद्धा हे दाखवत नाही की आरोपी हिंसेत सहभागी होती.

amulya leona

amulya leona

8. अमल्या लियोना

नागरिकत्व सुधारित कायदा (सीएए) विरोधी आंदोलनात अमूल्या लियोना दक्षिण भारतातील राज्यांमध्ये सहभागी होती. अमूल्या लियोनाचा जन्म कर्नाटकच्या मैसूरमध्ये 31 जुलै, 2000 मध्ये झाला. ती फेसबुकसह सोशल मीडियावर सुद्धा खुप अ‍ॅक्टिव्ह आहे. कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये सीएएविरूद्ध काढण्यात आलेल्या रॅलीच्या मंचावर असदुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत अमूल्या लियोनाने ’पाकिस्ताान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या, त्यानंतर तिच्याविरूद्ध केस दाखल करून तिला जेलमध्ये पाठवण्यात आले होते. (woman in india politics)

navdeep kaur

navdeep kaur

9. नौदीप कौर

दलित अ‍ॅक्टिव्हिस्ट आणि मजूर अधिकार संघटनेची सदस्या नौदीप कौरच्या अटकेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. पंजाबच्या मुक्तसर साहिबमधील ग्यानंदर गावात राहणार्‍या नौदीपच्या वडीलांचे नाव सुखदीप सिंह आहे. नौदीपला 12 जानेवारीला अटक करण्यात आली होती, जेव्हा ती अन्य मजूरांसह कुंडलीमध्ये आंदोलन करत होती. पोलिसांनी तिला आयपीसीचे कलम 148, 149, 323, 452, 384 आणि 506 अंतर्गत अटक केली होती. मात्र, नौदीप कौरची छोटी बहिण राजवीर कौरने म्हटले की, तिच्या बहिणीला खोट्या आरोपात अडकवण्यात आले आहे. माझी बहिण मजूर आणि दलित अधिकार कार्यकर्ती आहे. ती फॅक्टरीत काही मजूरांना मजूरी मिळवून देण्यासाठी गेली होती. परंतु, कारखाना मालकाने तिला उलट फसवले. (woman in india politics)

shehla rashid

shehla rashid

10. शहला रशीद

जवाहर लाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची माजी उपाध्यक्ष शहला रशीद फेब्रुवारी 2016 मध्ये प्रसिद्धाच्या झोतात आली होती.
देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपात कन्हैयाला जेलमध्ये जावे लागले होते, परंतु शहला रशिद यातून सुटली होती.
ती मोदी सरकारची कट्टर विरोधक मानली जाते आणि तिच्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असते.
18 ऑगस्ट 2019 ला शहलाने ट्विट करून भारतीय लष्करावर काश्मीरी लोकांवर अत्याचार करण्याचे
गंभीर आरोप केले होते, ज्यामुळे तिच्याविरूद्ध दिल्ली पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता.
याच वर्षी जानेवारीमध्ये शहलाच्या वडीलांनी जम्मू-काश्मीरच्या डीजीपींना पत्र लिहून आपल्या मुलीवर देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा गंभीर आरोप केले होते.

Related Posts