IMPIMP

Blood Sugar Level | ‘ब्लड शुगर’च्या उपचारासाठी परिणामकारक ठरू शकते उंटीणीचे दूध, जाणून घ्या इतर फायदे

by nagesh
Diabetes - Milk | daibetes-patients-drink-milk-may-increase-the-blood-sugar-of-patients-know-what-is-the-truth

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Blood Sugar Level | जगात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या अहवालानुसार, जगभरात सुमारे 442 मिलियन लोक या धोकादायक आजाराशी झुंज देत आहेत. तर इंडियन डायबिटीज फेडरेशनच्या (indian diabetes federation) म्हणण्यानुसार, भारतात सुमारे 7 कोटी लोक या आजाराने ग्रस्त आहेत. शरीरातील ब्लड शुगरचे (Blood Sugar Level) प्रमाण वाढल्यामुळे मधुमेहाने ग्रस्त लोक अनेक गंभीर आजारांना बळी पडतात. ब्लड शुगरला ’स्लो पॉयझन’ (slow poison) असेही म्हणतात.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

दुधाचे सेवन आरोग्यासाठी चांगले असल्याचे सांगितले जाते. दूध आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो की, नवजात बालकांपासून ते वृद्धांपर्यंत दुधाचे सेवन करणे आवश्यक आहे. गाय आणि म्हशीचे दुध हे दुधाचे मुख्य स्त्रोत मानले जात असले तरी, अनेक देशांमध्ये या व्यतिरिक्त उंटाचे दूध (camel milk) देखील वापरले जाते.

 

पूर्वी उंटाचे दूध वाळवंटी भागात जास्त वापरले जायचे, पण गेल्या काही वर्षात ते बरेच लोकप्रिय झाले आहे. वास्तविक उंटाच्या दुधात प्रथिने जास्त आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण कमी असते आणि औषधी गुणधर्मामुळे ते औषध म्हणूनही वापरले जाते. जाणून घेऊया या दुधाचे सेवन करण्याचे फायदे –

किडनीसाठी फायदेशीर :
एनसीबीआयने प्रकाशित केलेल्या संशोधनात म्हटले आहे की उंटाचे दूध किडनी फेल्यूअर टाळण्यासाठी आणि पेशींच्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करू शकते. gentamicin (अँटीबायोटिक) च्या दुष्परिणामामुळे नेफोटॉक्सिक प्रभाव (किडनीचे नुकसान करणारा) होऊ शकतो. हा दुष्परिणाम टाळण्यासाठी उंटाचे दूध येथे उपयोगी पडू शकते. किडनीच्या आरोग्यासाठी उंटाचे दूध अप्रत्यक्षपणे फायदेशीर ठरू शकते. (Blood Sugar Level)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 


ब्लड शुगर नियंत्रित करा :
एका संशोधनात असे आढळून आले आहे की उंटाच्या दुधाचा वापर ब्लड शुगरवर नियंत्रण ठेवण्यासाठी होऊ शकतो,
कारण दुधात ब्लड शुगर कमी करणारे गुणधर्म असतात ज्याला अँटीहायपरग्लायसेमिक प्रभाव म्हणतात.

 

मधुमेहासाठी घरगुती उपाय:
इंटरनॅशनल जर्नल ऑफ एंडोक्रिनोलॉजी अँड मेटाबॉलिझमने केलेल्या संशोधनानुसार,
उंटाचे दूध लिपिड प्रोफाइल सुधारण्यास आणि इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करण्यास मदत करते,
ज्यामुळे दुधाचा वापर मधुमेहासाठी घरगुती उपाय म्हणून केला जाऊ शकतो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- Blood Sugar Level | camel milk can be effective in treating blood sugar you should know other benefits

 

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 79 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पुण्यात विमानाने यायचे आणि चोरी करुन परत जायचे, गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

Post Office Scheme | पोस्टाच्या ‘या’ योजनेत करा केवळ 400 रुपयांची गुंतवणूक, मॅच्युरिटीवर मिळेल 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम

 

Related Posts