IMPIMP

तणावाच्या दिवसांमध्ये आहारात समाविष्ट करा ‘या’ गोष्टी, डोक राहिल एकदम शांत, जाणून घ्या

by bali123
eat this things in depression for good results

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – आजकालच्या धावपळीच्या नित्यकर्मात ताणतणाव आणि चिंता असणे खूप सामान्य बाब आहे. अशा परिस्थितीत या समस्या लवकरात लवकर मिटविणे फार महत्त्वाचे आहे, अन्यथा यामुळे आपल्या जीवनावर वाईट परिणाम होण्यास सुरुवात होते. नंतर, मानसिक समस्यांचा परिणाम शरीरावर देखील दिसू लागतो. म्हणूनच, आपल्या आहारात बदल करून, आपल्या दिनक्रमात लहान बदल करून ही समस्या दूर केली जाऊ शकते.जाणून घ्या कशामुळे चिंता आणि तणाव दूर करता येतात

हळद
हळदीमध्ये एक घटक आढळतो, याला कर्क्युमिन म्हणतात. कर्क्यूमिन चिंता आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करून चिंता कमी करण्यास मदत करते. ज्यांना चिंता सतावत राहते त्यांनी आपल्या आहारात हळदीचा समावेश करावा. तसे, हळद प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात आढळते आणि बहुतेक भाज्यांमध्ये देखील आढळते; परंतु तणावग्रस्त दिवसांमध्ये ती किंचित वाढवणे हितकारक आहे

दही
असे जीवाणू दह्यामध्ये आढळतात जे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात. लॅक्टोबॅसिलस आणि बिफिडोबॅक्टेरिया या दोन्ही गोष्टी मेंदू निरोगी राहण्यास मदत करतात. २०१५ मध्ये झालेल्या अभ्यासात असेही समोर आले आहे की दहीचे सेवन केल्याने काही तरुणांना मनात आनंद निर्माण झाला. म्हणून, यावेळी दही सेवन करावे.

ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये थिनॅनिन नावाचा एक अमीनो अ‍ॅसिड असते जे मूड स्विंगला नियंत्रित ठेवतो. थॅनानिनमध्ये चिंता-विरोधी आणि शांत करणिरे घटक असतात. ज्यामुळे सेरोटोनिन आणि डोपामाइनचे उत्पादन वाढू शकते. आपण आपल्या आहारात सहज ग्रीन टी घेऊ शकता. चिंतेच्या दिवसात, आपण एका दिवसात २-३ कप ग्रीन टी पिऊ शकता. यामुळे शरीरावर कोणतीही हानी होणार नाही.

अंडी
अंडी खाणार्‍या लोकांकडे चांगला पर्याय असतो. अंड्यात भरपूर अमीनो अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन-डी असते. त्यात ट्रिप्टोफॅन नावाचे एक अमीनो अ‍ॅसिड आढळते जो सेरोटोनिन तयार करण्यास मदत करतो. सेरोटोनिनसह, आपला मूड, झोप, स्मृती आणि वर्तन सर्व सामान्य राहते. मेंदूला स्थिर करून चिंता कमी करते.

पुण्यात लॉकाडाउन नाहीच ! उपाययोजनांची कडक अंमलबजावणी

Mukesh Ambani Bomb Scare : तिहार जेलमधील दहशतवादी तहसीन अख्तरकडून मोबाईल हस्तगत

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

Related Posts