IMPIMP

7th Pay Commission | कर्मचार्‍यांना मिळाली खुशखबर ! DA मध्ये झाली 3% ची वाढ, सरकारने केली घोषणा

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission big news for central employees announcement of finance ministry over to da

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांना (Government Employees) लॉटरी लागली आहे. तुम्हीही डीए वाढीची वाट पाहत असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपली आहे. सरकारने 3 टक्के महागाई भत्ता (Dearness Allowance – DA) वाढवण्याची घोषणा केली आहे. नुकतीच हिमाचल प्रदेश राज्य सरकारने महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ केली आहे. आता तेथील सरकारी कर्मचार्‍यांना 3 टक्के जास्त महागाई भत्ता म्हणजेच डीए मिळणार आहे. (7th Pay Commission)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

हिमाचल प्रदेश सरकारी कर्मचार्‍यांना पूर्वीपेक्षा 3 टक्के जास्त महागाई भत्ता मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी 31 टक्के महागाई भत्ता जाहीर केला आहे. यापूर्वी कर्मचार्‍यांना 28 टक्के महागाई भत्ता मिळत होता. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी कर्मचार्‍यांना 3 टक्के अतिरिक्त महागाई भत्ता देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर 500 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

 

याशिवाय कल्याणकारी योजना आणि पेन्शनचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने वार्षिक उत्पन्न मर्यादा 35,000 रुपयांवरून 50,000 रुपये केली आहे. (7th Pay Commission)

केंद्रातील मोदी सरकार लवकरच महागाई भत्त्यातही वाढ करू शकते. डिसेंबर 2021 पर्यंत CPIIW चा आकडा 125 वर आला, तर महागाई भत्त्यात तीन टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. सध्या एकूण महागाई भत्ता (DA) 31 टक्के आहे, जो 34 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. महागाई भत्ता 34 टक्के केला तर पगारात 20 हजार रुपयांची वाढ होऊ शकते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

3 टक्के वाढीमुळे सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारात 20,000 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. 7व्या केंद्रीय वेतन आयोगाअंतर्गत सरकारी कर्मचार्‍यांचा डीए मूळ वेतनाच्या आधारे मोजला जातो.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission da hike big update 3 percent dearness allowance da increase by government

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | संजय राऊतांचा थेट इशारा, म्हणाले – ‘… तर तुम्हाला नागपुरलाही जाता येणार नाही’

Minimum Basic Salary-Pension | खुशखबर ! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे वाढणार कर्मचार्‍यांची पेन्शन, जाणून घ्या किती होईल वाढ

Ajit Pawar | अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शनिवार, रविवारीही शाळा सुरु ठेवा; अजित पवारांचे शिक्षकांना आवाहन

 

Related Posts