IMPIMP

Minimum Basic Salary-Pension | खुशखबर ! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे वाढणार कर्मचार्‍यांची पेन्शन, जाणून घ्या किती होईल वाढ

by nagesh
Minimum Basic Salary-Pension | central government employees pension may increase 300 percent if supreme court allow to change formula know detail

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाMinimum Basic Salary-Pension | कर्मचार्‍यांच्या किमान पेन्शनमध्ये (Minimum Pension) लवकरच मोठी वाढ होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) मध्ये योगदान देणार्‍या लाखो कर्मचार्‍यांच्या पेन्शनमध्ये (EPS) वाढ होऊ शकते. आत्तापर्यंत, पेन्शनची गणना करण्यासाठी मूळ वेतन निर्धारित आहे, जे किमान मासिक मूळ वेतन (Minimum Basic Salary) 15,000 रुपये आहे. (Minimum Basic Salary-Pension)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

वास्तविक, एखाद्या कर्मचार्‍याचा मूळ पगार 15,000 रुपयांपेक्षा जास्त असला तरी, पेन्शनची गणना मात्र केवळ 15,000 रुपयांवर केली जाते. हा अडथळा दूर झाला तर पेन्शन निश्चितीचे गणितही बदलेल. म्हणजेच, जर एखाद्याचा मूळ पगार 20,000 रुपये असेल तर 20,000 रूपयांवर पेन्शन काढली जाईल, यामुळे किमान पेन्शन सुमारे 1,000 रुपयांनी वाढेल आणि ती 8,571 रुपयांपर्यंत पोहोचेल.

 

असे समजून घ्या पेन्शनचे गणित
तुमचा मूळ पगार 15,000 रुपयांपेक्षा जास्त असला तरीही, पगारावरील पीएफ केवळ 15,000 रुपये मोजला जाईल. म्हणजेच, जर एखाद्या कर्मचार्‍याचा मूळ पगार 40,000 रुपये असेल आणि त्याला त्याची पेन्शन 40,000 वरच कॅलक्युलेट करायची असेल, तर तो करू शकत नाही, कारण सध्याच्या कायद्यात तशी परवानगी नाही असे सांगितले जात आहे. सुप्रीम कोर्टाने पगाराची ही मर्यादा हटवली तर कर्मचार्‍यांना कितीतरी पट जास्त पेन्शन (Pension Hike) मिळेल. (Minimum Basic Salary-Pension)

 

असे आहे संपूर्ण प्रकरण
कर्मचारी निवृत्ती वेतन सुधारणा योजना केंद्र सरकारने 1 सप्टेंबर 2014 रोजी अधिसूचनेद्वारे लागू केली.
याला खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांनी विरोध केला होता. यावर ईपीएफओने सर्वोच्च न्यायालयात एसएलपी दाखल केली.
1 एप्रिल 2019 रोजी, EPFO च्या SLP वर सुनावणी करताना, सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की पेन्शनचे वेतन 15 हजार रुपये निश्चित करण्याचे कोणतेही समर्थन नाही. 17 ऑगस्टपासून या प्रकरणावर सातत्याने सुनावणी सुरू असून अद्याप निर्णय येणे बाकी आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

इतकी वाढू शकते पेन्शन
समजा एखाद्या कर्मचार्‍याचा पगार (मूळ पगार आणि DA) 20 हजार रुपये आहे.
बदललेल्या पेन्शन फॉर्म्युल्यानुसार, त्याची पेन्शन 7,500 रुपयांवरून 8,571 रुपये होईल.
ईपीएस कॅलक्युलेशनचा फार्म्युला = मासिक पेन्शन = (पेन्शनपात्र वेतन x EPS योगदान) ने तपासू शकता.
अशा प्रकारे, पेन्शनमध्ये थेट 300% ने वाढू शकते.

 

Web Title :- Minimum Basic Salary-Pension | central government employees pension may increase 300 percent if supreme court allow to change formula know detail

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शनिवार, रविवारीही शाळा सुरु ठेवा; अजित पवारांचे शिक्षकांना आवाहन

Tata Group चा ‘हा’ शेयर पुन्हा घेऊ लागला उसळी !

Personal Finance | अवघे 3,000 रुपये वाचवून सुद्धा बनू शकता करोडपती, जाणून घ्या काय आहे कॅलक्युलेशन

 

Related Posts