IMPIMP

7th Pay Commission | खुशखबर ! PMPML च्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

by nagesh
7th Pay Commission | Good news 7th Pay Commission applied to PMPML employees

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन 7th Pay Commission | पुणेकरांची सेवा करणाऱ्या PMPML कर्मचाऱ्यांना पुणे महानगरपालिकेतील (Pune
Corporation) सत्ताधाऱ्यांनी सातवा वेतन आयोग (7th Pay Commission) लागू न केल्याने शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्या
नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (Pune NCP) वतीने चार दिवसांपूर्वी आंदोलन (Agitation) केले होते. यावेळी हजारो कर्मचाऱ्यांनी पुणे मनपा भवनला मानवी साखळी (Human Chain) करून घेराव घालण्यात आला होता. पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेल्या आंदोलनाला यश आले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आंदोलनानंतर येत्या महानगरपालिका निवडणुकीत (Municipal Elections) भाजपच्या (BJP) विरोधात मोठा रोष निर्माण होऊ शकतो असे दिसताच सत्ताधाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत (PMC Standing Committee Meeting) घेतला. यासाठीचा ठराव नगरसेवक प्रदीप गायकवाड (Corporator Pradip Gaikwad) यांनी दिला होता तर त्यास अनुमोदन नगरसेविका नंदा लोणकर (Corporator Nanda Lonakar) यांनी दिले होते. (7th Pay Commission)

 

पुणे महानगरपालिकेच्या या निर्णयाचे स्वागत करतानाच आपल्या न्याय्य हक्कासाठी PMPML कर्मचाऱ्यांना वारंवार आंदोलन करावे लागले ही बाब पुणे शहराला गौरवास्पद नाही. अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली. यावेळी प्रवक्ते प्रदीप देशमुख (NCP Pradeep Deshmukh), राष्ट्रवादी कामगार सेल अध्यक्ष शिवाजीराव खटकाळे (Shivajirao Khatkale), किरण थेऊरकर (Kiran Theurkar), सुनील नलवडे (Sunil Nalwade), राजेंद्र कोंडे (Rajendra Konde), हरीश ओहळ (Harish Ohal), कैलास पासलकर (Kailas Pasalkar) उपस्थीत होते. यावेळी कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी फटाके वाजवून व पेढे वाटून आपला आनंद साजरा केला.

 

Web Title :- 7th Pay Commission | Good news 7th Pay Commission applied to PMPML employees

 

हे देखील वाचा :

Uday Samant | पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण 14 फेब्रुवारीला होणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती

CBSE Term 2 Exam Date | सीबीएसई टर्म 2 परीक्षेच्या तारखेची घोषणा, पहा CBSE ची नोटिस

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 1694 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | मोक्का गुन्ह्यात फरार असलेल्या निलेश घायवळ टोळीतील एकाला गुन्हे शाखेकडून अटक

 

Related Posts