IMPIMP

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलिशियस् संघाने उद्घाटनाचा दिवस गाजवला !

by nagesh
7th Punit Balan Group Women's Premier League T-20 Cricket Tournament

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनअ‍ॅल्थिट्युड स्पोर्ट्स मॅनेजमेंट तर्फे आयोजित सातव्या ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद टी-२०
क्रिकेट स्पर्धेत (Punit Balan Group Women’s Premier League) सायली लोणकर (Saily Lonakar) हिच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर न्युट्रीलिशियस् संघाने ऑक्सिरीच स्मॅशर्स संघाचा ७ गडी राखून पराभव करत उद्घाटनाचा दिवस गाजवला. (Punit Balan Group Women’s Premier League)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ऑक्सिरीच स्मॅशर्स संघाला पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात केवळ ८२ धावा जमविता आल्या. तेजल हसबनीस (१७ धावा), श्रद्धा पोखरकर (१६ धावा) आणि जाई देवन्नावर (१३ धावा) यांनी संघाचा डाव सावरला. सायली लोणकर हिने १५ धावात ३ गडी बाद करून भेदक गोलंदाजी केली. या शिवाय संजना वाघमोडे (२-१२) व आरती बाहेनवाल (२-१२) यांनीही अचूक गोलंदाजी केली.

 

 

हे आव्हान न्युट्रीलिशियस् संघाने १२.५ षटकात व ३ गडी गमावूण पूर्ण केले. गौतमी नाईक हिने नाबाद ३० धावा तर,
सायली लोणकर हिने नाबाद २३ धावांचे योगदान दिले व संघाने स्पर्धेत विजयी सलामी दिली.

स्पर्धेचे उद्घाटन लिजंड्स स्पोर्ट्स क्लबचे संचालक संदीलदादा कोद्रे आणि सौरभ रवालिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हृषीकेश आगाशे,
प्रफुल्ल मानकर, रोहीत खारडे, स्पर्धेचे संचालक अमित गणपुळे आणि अभिराज वाधवाने आदि मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

गटसाखळी फेरीः सामन्याचा संक्षिप्त निकालः

ऑक्सिरीच स्मॅशर्सः २० षटकात १० गडी बाद ८२ धावा (तेजल हसबनीस १७, श्रद्धा पोखरकर १६, जाई देवन्नावर १३, सायली लोणकर ३-१५,
संजना वाघमोडे २-१२, आरती बाहेनवाल २-१२) पराभूत वि. न्युट्रीलिशियस् संघः १२.५ षटकात ३ गडी बाद ८३ धावा (गौतमी नाईक नाबाद ३०,
सायली लोणकर नाबाद २३, सोनल पाटील १३, श्रद्धा पोखरकर १-२२); सामनावीरः सायली लोणकर.

 

Web Title : 7th Punit Balan Group Women’s Premier League T-20 Cricket Tournament

 

हे देखील वाचा :

Sadabhau Khot On Shivsena | ‘भाजपामुळे सेना 25 वर्षे जगली’ – सदाभाऊ खोत

Pune Crime | विनयभंग करणाऱ्या आरोपीला चंदननगर पोलिसांकडून शेगाव येथून अटक

Pune Pimpri Crime | धक्कादायक ! फॅशन डिझायनिंगच्या क्लासला निघालेल्या तरुणीचे अपहरण आणि बलात्कार

 

Related Posts