IMPIMP

8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! 8 वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता; किती वाढेल वेतन? जाणून घ्या

by nagesh
Business Ideas | business ideas start your own business with take franchise and earn 80k monthly

नवी दिल्ली – वृत्तसंस्था 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Government Employees) एक महत्वाची माहिती समोर आली
आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग (8th Pay Commission) लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सातव्या वेतन आयोगाच्या
(7th Pay Commission) शिफारशी असुन देखील कमी वेतन मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारी आता मिटवल्या जाऊ शकतात. त्यामुळे
सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी देशभरात लागू आहेत आणि कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळत आहे. परंतु, अनेक कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. कर्मचारी संघटनेने एक निवेदन तयार केले आहे. पगार वाढवण्याची अथवा आठवा वेतन आयोग (8th Pay Commission) आणण्याची मागणी केली जाणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सध्या कमीतकमी पगार मर्यादा 18 हजार रुपये ठेवण्यात आलीय. यामध्ये इन्क्रिमेंटमध्ये फिटमेंट फॅक्टरला खूप महत्त्व देण्यात आले आहे. सध्या हा घटक 2.57 पट आहे, जरी सातव्या वेतन आयोगात तो 3.68 पट ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. असे झाल्यास कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपयांवरुन 26 हजार रुपये होईल. असं केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे (Unions of Central Employees) म्हणणे आहे.

सातव्या वेतन आयोगानंतर नवीन वेतन आयोग येणार नाही. त्याऐवजी सरकार अशी यंत्रणा राबवणार आहे, ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात आपोआप वाढ होईल. ही एक ‘स्वयंचलित वेतन पुनरावृत्ती प्रणाली’ असू शकते, ज्यात महागाई भत्ता म्हणजेच DA 50 टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास, वेतनात स्वयंचलित सुधारणा होईल. असे झाल्यास 68 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 52 लाख पेन्शनधारकांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे. पण, यासंदर्भात शासन निर्णय जारी झाल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो.

 

दरम्यान , महागाई पाहता मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांचा पगार खालच्या स्तरावरुन वाढवावा.
अशा स्थितीत सरकारने 2023 मध्ये वेतनाचा नवा फॉर्म्युला आणला तर मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांना
फारसा फायदा होणार नसला तरी कमी उत्पन्न गटातील कर्मचाऱ्यांना चांगला लाभ मिळू शकतो.
त्याचे मूळ वेतन तीन हजार ते 21 हजार रुपयांनी वाढू शकतो.
अशी माहिती अर्थ मंत्रालयाच्या (Ministry of Finance) एका अधिकाऱ्याने दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- 8th Pay Commission | imd news for central government employees 8th pay commission will be implemented know how much salary will increase

 

हे देखील वाचा :

Maharashtra Rains Update | राज्यात काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’

Jalna Crime | पुण्यातून KTM मोटारसायकल चोरणारी दुकली जालना पोलिसांकडून गजाआड, 5 दुचाकी जप्त

Shivsena | उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का ! माजी खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

 

Related Posts