IMPIMP

Jalna Crime | पुण्यातून KTM मोटारसायकल चोरणारी दुकली जालना पोलिसांकडून गजाआड, 5 दुचाकी जप्त

by nagesh
Pune Crime News | Kondhwa: Arrested three people who beat the investigating beat marshal police
जालना : सरकारसत्ता ऑनलाइन – Jalna Crime | पुणे जिल्ह्यातून महागड्या दुचाकी (Bike) व मोबाईल चोरणाऱ्या (Mobile Thieves) जालना जिल्ह्यातील (Jalna Crime) दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch (LCB) अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 दुचाकी व 4 मोबाईल असा एकूण 8 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी (दि.17) जलना शहरातील नूतन वसाहत भागात करण्यात आली. आरोपींनी पुणे शहर (Pune City) व परिसरातून दुचाकी चोरल्याचे तपासात समोर आले आहे.

 

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे (SP Dr. Akshay Shinde) यांनी जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहीती घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेकडून दुचाकी चोरांची माहिती घेत होती. त्यावेळी संदेश पाटोळे (Sandesh Patole) याने त्याच्या साथीदारासह अनेक महागड्या दुचाकी चोरल्या असून त्याची विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती मिळाली. यावरुन पोलिसांनी सापळा रचून संदेश प्रभाकर पाटोळे (रा. शिराळा, ता. जफराबाद) याला ताब्यात घेतले. (Jalna Crime)

 

पुण्यातून महागड्या दुचाकींची चोरी
त्याच्याकडे असलेल्या केटीएम दुचाकी (KTM Bike) विषयी चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार सुरज राजु कसबे (रा. म्हाडा कॉलनी) याच्या सोबत दोन दिवसांपूर्वी पुणे येथील मोरे वस्तीमधून दोन केटीएम दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad), पुणे येथून यापूर्वी देखील आणखी दोन केटीएम दुचाकी व जालना येथून एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच पुणे येथुन अनेक मोबाईल चोरल्याचे सांगितले.

4 केटीएम जप्त
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 4 केटीएम दुचाकी व एक हिरो होन्डा कंपनीची सीडी डॉन, 4 मोबाईल असा एकूण 8 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे शाखेने आरोपींची माहिती पिंपरी-चिंचवड, पुणे पोलिसांना दिली आहे. त्यानुसार अनेक दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पुढील तपास सदर बाजार पोलीस (Sadar Bazar Police) करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख (Addl SP Vikrant Deshmukh)
यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग (Police Inspector Subhash Bhujang),
पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले (PSI Pramod Bondle), अंमलदार सॅम्युअल कांबळे, भाऊसाहेब गायके,
कृष्णा तंगे, सचिन चौधरी, रवि जाधव, धिरज भोसले, कैलास चेके, योगेश सहाने, चालक सुरज साठे यांनी केली आहे.

 

Web Title :- Jalna Crime | two arrested for stealing expensive motorcycles and mobile phones from pune city

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 20 हजाराची लाच मागणाऱ्या कोतवालावर पुणे एसीबीकडून FIR

Pune Crime | महिलेचा खून करुन दागिने, रोख रक्कम चोरणाऱ्याला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक, 5.38 लाखाचा मुद्देमाल जप्त

Shivsena | उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! 14 खासदार शिंदे गटाच्या बैठकीला हजर

Related Posts