IMPIMP

आपले Aadhaar Card मिनिटात करा ITR सोबत लिंक, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

by nagesh
Aadhaar Card | link your aadhar card with income tax return in minutes know process

नवी दिल्ली : वृत्तसंस्था UIDAI संस्थेद्वारे जारी करण्यात येणार्‍या आधार कार्डचा (Aadhaar Card) वापर भारतात एक महत्वाचे कागदपत्र म्हणून केला जातो. ओळखीपासून कोणत्याही सरकारी योजनेच्या लाभासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) असणे आवश्यक आहे.

 

तसेच पॅनकार्ड (PAN Card) आणि इतर कागदपत्रे सुद्धा आधारसोबत लिंक केली जात आहेत. जर तुम्ही एक करदाता असाल आणि इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) दाखल करत असाल, तर हे जाणून घ्या की, आयटीआर भरण्यापूर्वी आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे, याशिवाय तुमचे ITR पूर्ण होणार नाही.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

नियमानुसार रिटर्न आधार नंबरशिवाय इलेक्ट्रॉनिक किंवा मॅन्युअल पद्धतीने भरता येणार नाही. आयटीआर फाईल करताना कलम 139AA(1)(ii) अतर्गत आधार नंबर देणे आवश्यक आहे. केवळ विशेष परिस्थितीत यातून सूट दिली जाते. (Aadhaar Card)

 

आधार कार्ड ITR सोबत असे करा लिंक

– सर्वप्रथम https://incometaxindiaefiling.gov.in/ वर जा.

– नाव आणि पासवर्डसह लॉगिन करा.

– होम पेजवर प्रोफाईल सेटिंग्ज पर्याय निवडा आणि लिंक आधार पर्याय वर जा.

– येथे आधारची माहिती नोंदवा. लिंक करा पर्याय निवडा.

– आता पॅन डेटासह आधार तपशीलाची पडताळणी करा.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

– इन्कम टॅक्स व्हेरिफाय करण्यासाठी ‘रिटर्न ई-वेरिफाई करण्यासाठी आधार ओटीपी जनरेट करायचा असेल तर हा पर्याय निवडा.

– आधार कार्ड नोंदणीकृत मोबाइल नंबरवर वन टाइम पासवर्ड (OTP) येईल.

– मोबाईल नंबरवर पाठवलेल्या ओटीपीचा वापर अपलोड करण्यात आलेला रिटर्न ई-वेरीफाय करण्यासाठी केला जाऊ शकतो.

– यानंतर तुमच्या समोर यशस्वीपणे आयटीआरसोबत आधार लिंक झाल्याचा मेसेज येईल. आता पावती डाऊनलोड किंवा सेव करून ठेवा.

 

Web Title :- Aadhaar Card | link your aadhar card with income tax return in minutes know process

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील सराईत वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 49 जणांवर कारवाई

Prakash Telang | टाटा मोटर्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रकाश तेलंग यांचे निधन

ST Workers Strike | निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा एक संधी, अनिल परब यांनी केली मोठी घोषणा

Ajit Pawar | ‘लोकांनी काही वक्तव्य करताना तारतम्य बाळगले पाहिजे’

 

Related Posts