IMPIMP

Pune Crime | पुण्यातील सराईत वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 49 जणांवर कारवाई

by nagesh
Pune Crime | MPDA Action On Criminal of Hadapsar CP Amitabh Gupta

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरातील (Pune Crime) अलंकार पोलीस ठाण्याच्या (Alankar Police Station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 49 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार प्रवीण तुकाराम कुडले Praveen Tukaram Kudle (वय-29 रा. क्रांतीसेन कमानी शेजारी,
सुतारदरा, कोथरुड, पुणे) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे (criminal) नाव आहेत. प्रवीण कुडले याला एमपीडीए
कायद्यान्वये येरवडा कारागृहात (Yerawada Jail) एक वर्षाकरीता स्थानबद्ध करण्यात आले आहे. (Pune Crime)

 

कुडले हा सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह कोथरुड (Kothrud Police Station), उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या (Uttamnagar Police Station) हद्दीत तलवार, कोयता, चाकू, सुरा यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने जबर दुखापत करणे, दंगा, मारामारी, विनापरवाना हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 4 गंभीर गुन्हे अलंकार पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन गुन्हेगारावर एमपीडीए अ‍ॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले. अलंकार पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बर्गे (senior police inspector Santosh Barge), पोलीस निरीक्षक संगिता पाटील (Inspector of Police Sangita Patil) व पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude) यांनी ही कामगिरी केली.

 

पोलीस आयुक्तांनी मागील एक वर्षात 49 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

Web Title :- Pune Crime | CP Amitabh Gupta takes action against 49 under MPDA Act pune police

 

हे देखील वाचा :

Prakash Telang | टाटा मोटर्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रकाश तेलंग यांचे निधन

ST Workers Strike | निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा एक संधी, अनिल परब यांनी केली मोठी घोषणा

Ajit Pawar | ‘लोकांनी काही वक्तव्य करताना तारतम्य बाळगले पाहिजे’

 

Related Posts