IMPIMP

Prakash Telang | टाटा मोटर्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रकाश तेलंग यांचे निधन

by nagesh
Prakash Telang | former managing director of tata motors prakash telang passed away

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Prakash Telang | टाटा मोटर्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक (Former MD) प्रकाश तेलंग यांचे बुधवारी (दि.8) निधन (Prakash Telang) झाले. ते 74 वर्षांचे होते. प्रकाश तेलंग यांनी तीन दशके टाटा मोटर्समध्ये (Tata Motors) काम केले. 2012 मध्ये ते सेवा निवृत्त झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

प्रकाश तेलंग (Prakash Telang) यांनी 1967 मध्ये नागपूर येथील व्हीएनआयटी (VNIT) येथून यांत्रिकी अभियांत्रिकी मध्ये पदवी प्राप्त घेतली. त्यानंतर
त्यांनी 1972 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद (Indian Institute of Management Ahmedabad) येथून त्यांनी पदव्युत्तर
पदविका पूर्ण केली. सुरुवातीला लार्सन आणि टुब्रोमध्ये (Larsen and Tubro) काम क्ल्यानंतर टाटा अ‍ॅडमिनिस्टेशन सर्व्हिस मार्फत त्यांनी पिंपरीतील
टाटा मोटर्स येथील ग्रोथ विभागात असिस्टंट मॅनेजर म्हणून कामास सुरुवात केली.

टाटा मोटर्सच्या लोकप्रिय ठरलेल्या 407 टेम्पोच्या (407 tempo) संशोधन आणि निर्मितीमध्ये प्रकाश तेलंग (Prakash Telang Passed Away) यांचा मोठा वाटा होता. याशिवाय 2005 मधील छोटा हत्ती (Tata ACE) या वाहनाच्या निर्मिती मध्ये त्यांचे बहुमोल योगदान आहे. मनमिळावू स्वभाव आणि प्रेरणादायी संभाषणामुळे ते कामगारांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. 2009 मध्ये त्यांची व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली. टाटा उद्योग समुहातील (Tata Industries Group) अवजड आणि व्यापारी वाहन उत्पादन व्यवस्थापन, संशोधन क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

Web Title :- Prakash Telang | former managing director of tata motors prakash telang passed away

 

हे देखील वाचा :

ST Workers Strike | निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा एक संधी, अनिल परब यांनी केली मोठी घोषणा

Ajit Pawar | ‘लोकांनी काही वक्तव्य करताना तारतम्य बाळगले पाहिजे’

नोकरी बदलल्यानंतर EPFO मध्ये नोंदवली नाही Date of Exit, तर स्वत: करू शकता अपडेट; जाणून घ्या प्रोसेस

 

Related Posts