IMPIMP

Aadhaar Verification Update | आधार ‘Verification’ साठी सरकारने जारी केले नवीन नियम; जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Aadhaar Card Security | aadhaar card use these services to secure personal data on aadhaar card know detail

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Aadhaar Verification Update | देशातील नागरीकांचे आधार कार्ड (Aadhaar Card) हे एक महत्वाचे कागदपत्र आहे. खासगी आणि सरकारी कामामध्ये आधार कार्ड आवश्यक असते. त्याशिवाय कोणतेही काम होत नाही. UIDAI देखील आधारशी संबंधित माहिती वेळोवेळी देतेय. सरकारने आधार पडताळणीबाबत नवा नियम (New Rule) जारी केला आहे. त्यानुसार तुमचा आधार ऑफलाइन अथवा कोणत्याही इंटरनेटशिवाय पडताळणी (Aadhaar Verification Update) करता येणार आहे. याबाबत सरकारने नवे नियम जारी केले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आधार धारकाला (Aadhaar Holder) आधार ई – केवायसी पडताळणी (E-KYC Verification) प्रक्रियेसाठी, कोणत्याही अधिकृत एजन्सीला आपला आधार पेपरलेस ऑफलाइन ई – केवायसी देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. यानंतर एजन्सी आधार धारकाने दिलेला आधार क्रमांक आणि नाव, पत्ता इत्यादी केंद्रीय डेटाबेसशी जुळवेल. जुळणी बरोबर असल्याचे आढळल्यास पडताळणीची प्रक्रिया पुढे नेली जातेय. (Aadhaar Verification Update)

 

दरम्यान, सरकारच्या नव्या नियमानुसार, आता तुम्हाला पडताळणीसाठी डिजिटली स्वाक्षरी केलेले दस्तऐवज सादर करावे लागणार आहेत, तसेच, ही डिजिटल सही भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणच्या माध्यमातून (UIDAI) जारी केलेल्या दस्ताऐवजावर हवी. या दस्ताऐवजावर यूजरच्या आधार क्रमांकाचे शेवटचे 4 अंक दिलेले असतात.

 

ऑफलाइन आधार पडताळणीचे प्रकार –

नियमांनुसार, UIDAI खालील प्रकारच्या ऑफलाइन पडताळणी सेवा प्रदान करेल.

QR कोड पडताळणी

आधार पेपरलेस ऑफलाइन ई – केवायसी पडताळणी

ई – आधार पडताळणी

ऑफलाइन पेपर आधारित पडताळणी

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आधार पडताळणी पद्धती –

डेमोग्राफिक प्रमाणीकरण

वन-टाइम पिन आधारित प्रमाणीकरण

बायोमेट्रिक आधारित प्रमाणीकरण

मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन

 

Web Title :- Aadhaar Verification Update | modi central govt allows offline aadhaar verification by sharing digitally signed documents issued by uidai aadhaar news

 

हे देखील वाचा :

Rupali Chakankar Threat Case | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना धमकी देणाऱ्याला अटक

Pune Crime | डिलीव्हरीसाठी दिलेले एलईडी टिव्ही टेम्पोचालकाने परस्पर विकले; कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा

Pune Pimpri Crime | मुलीचे फोटो मॉर्फ करुन एस्कॉर्ट साईटवर अपलोड करण्याची डॉक्टरला धमकी, खंडणी मागणाऱ्या महिलेला अटक

 

Related Posts