IMPIMP

Abdul Sattar On Thackeray Group | “एखाद्या महिलेनं मला चोर, गद्दार म्हंटलं तर कसं सहन करणार’? अब्दुल सत्तार यांचा प्रश्न

by nagesh
Abdul Sattar On Thackeray Group | abdul sattar slams thackeray group over controversial statement

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाईन   Abdul Sattar On Thackeray Group | ‘एखाद्या महिलेने मला चोर म्हटलं तर कसं सहन करू? महिलांनी
आमचा सन्मान ठेवावा, म्हणजे आम्ही देखील त्यांचा सन्मान ठेवू’. असं विधान राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. (Abdul Sattar On Thackeray Group)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिंदे गटाचे नेते आणि सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली होती. यानंतर अनेक नेत्यांनी त्यांच्या त्या विधानांवर कठोर शब्दांत टीका केली. आता, त्या प्रकरणावर सत्तार यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे.

 

सत्तार म्हणाले ‘महिलांना विनंती आहे, त्यांनी आमचा सन्मान ठेवावा, म्हणजे आम्ही त्यांचा सन्मान ठेवू. सुप्रिया सुळे एका कार्यकर्त्याला घरात घुसून मारीन, असं म्हणतात. मी त्याचं राजकारण केलं का?’ असा प्रश्न सत्तार यांनी केला. ‘आम्ही माणसं आहोत. आम्हाला परिवार आहे. त्यांच्यासमोर आम्हाला जाईल तिथं अपमानित केलं जात आहे. आम्ही किती अपमान सहन करणार? मी महिलांचा आदर करतो. मात्र एखाद्या महिलेनं मला चोर म्हंटलं तर कसं सहन करणार. आम्हाला गद्दार म्हटलं जात आहे. पाठीत खंजीर मारला, हे आरोप किती दिवस सहन करणार?’ असे ते म्हणाले.

 

 

यावेळी बोलताना सत्तार यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. ते म्हणाले, ‘लोक आताही त्यांना का सोडून जात आहेत,
याचा विचार उद्धव ठाकरे का करत नाहीत? राज्यातील वातावरण मूठभर लोकांकडून बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय.
आमचेही कार्यकर्ते अरेला कारे करू शकतात. याचे परिणाम राज्यात चांगले होणार नाहीत. जे काही चाललं आहे,
हे ठीक नाही.’ असं ही सत्तार म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Abdul Sattar On Thackeray Group | abdul sattar slams thackeray group over controversial statement

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बिबवेवाडी भागात दहशत माजविणाऱ्या अनिल चव्हाण व त्याच्या 7 साथीदारांवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 110 वी कारवाई

Ajit Pawar – Raj Thackeray | आम्ही दोघे ‘ओठात एक आणि पोटात एक’ असे बोलत नाही; अजित पवार राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत

Pune Pimpri Crime | मित्र तुरुंगात गेल्याच्या रागातून टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण, भोसरी परिसरातील घटना

 

Related Posts